श्रीकाळेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान, आसू व स्वदेशी भारत बचतगट, आसू यांच्या वतीने हुतात्मा राष्ट्रबंधू राजीवभाई दिक्षीत यांच्या जयंती व पुण्यतिथी दिनानिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेत ‘माझ्या स्वप्नातील भारत’ या निबंधासाठी, डाॅ. राजेश जोशी, विंग कमांडर (निवृत्त), सातारा यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.
हुतात्मा राष्ट्रबंधू राजीवभाई दिक्षीत यांच्या जयंती व पुण्यतिथी दिनी ३० नोव्हेंबर रोजी, स्वदेशी भारत साहित्य संमेलन २०२३ मध्ये डाॅ. जोशी यांना ‘स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार २०२३’ देऊन गौरवण्यात येणार आहे. याबद्दल डाॅ. जोशी यांचे साहित्यिक जगतात अभिनंदन होत आहे.