पंचायत समिती मुरबाड येथे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल व आमदार श्री. किसन कथोरे यांनी आज भेट दिली. खाते प्रमुखांचा आढावा घेऊन विविध योजनाबाबत सुचना देण्यात आले. तसेच पंचायत समिती अंतर्गत केंद्र पुरस्कृत योजना व राज्य पुरस्कृत घरकुल योजनाचा आढावा घेण्यात आला. तद्नंतर जल जिवन मिशन अंतर्गत पुर्ण व प्रगतीत असलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला.
आयुष्यमान भारत कार्ड संबंधित दररोज ५००० कार्ड तयार करण्यात यावे अशी सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यावेळी दिली. तसेच, ग्रामपंचायत न्हावे येथे जल जिवन मिशन अंतर्गत कामाना भेट दिली व घरकुल पाहणी केली.
ग्रामपंचायत मासले येथे आयुष्यमान भारत कार्ड संदर्भात भेट देऊन ग्रामसेवक, आशा सेविका, गटप्रवर्तक व वैद्यकिय अधिकारी यांना कामे वेळेत पुर्ण करण्यासंदर्भांत सुचित करण्यात आले तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र किशोर येथे भेट देऊन विविध सुचना देण्यात आल्या.