नवरात्रौत्सवास 15 ऑक्टोबरपासून सुरु होत असून आहे.घराघरात मोठ्या भक्तिभावाने घटस्थापना होणार आहे.दरवर्षी प्रमाणे हा उत्सव जल्लोषात साजरा होणार आहे.हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या नगर शहरातील सबजेल चौकातील तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये रविवारी 15 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता पारंपारिक पध्दतीने विधिवत घटस्थापना होणार आहे.
मंदिराचे रंगकाम पूर्ण झाले असून महापालिके कडून मंदिर परीसराची साफ सफाई करून स्वच्छ करण्यात येत आहे.मंदिरात रविवारी सकाळी देवी मूर्तीस पंचामृताचा अभिषेक,दह्या- दूध व हळदी कूंकुवाने देवीला अंघोळ पलंगे कुटूंबियातील गयाबाई,पार्वतीबाई,शीतल,रोहिणी सविता या महिला घालणार असून देवीला दागदागिने,अलंकार घालून नवीन साडी नेसवणार आहेत.नंतर घटस्थापना गणेश व शीतल तसेच अनंत व रोहिणी या दांपत्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.नंतर महाआरती होऊन दुपारी १ पासून भाविकांना दर्शन खुले राहणार आहे.मंदिर दर्शनासाठी दर्शन रांग पुढील बाजूने राहणार असून भाविक दर्शन करून मागील बाजूकडून म्हणजे सब जेल कडून बाहेर पडणार आहेत.तसेच रोज संध्याकाळी ८ वाजता आरती होणार आहे.१५ रोजी पलंगे कुटूंबियांच्या पलंगाचे संध्याकाळी मंदिरात आगमन होणार आहे.त्या दिवशी मुक्कामी राहून १६ रोजी त्याचे प्रस्थान होणार आहे.श्री तुळजाभवानी मंदिराचे मुख्य पुजारी नगरचे बाबुराव पलंगे,गणेश पलंगे,अनंत पलंगे, उमेश पलंगे यांच्यासह स्वयंसेवक नवरात्रोत्सवाची तयारी करीत आहेत.