व्यावसायिक व घरगुती वीज मीटर बसवून देण्याच्या मोबदल्यात सात हजार रुपयांची लाच घेताना वाडिवर्हे येथील नागेश्वर रघुनाथ पेंढारकर आणि शुभम रामहरी जाधव अशा दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल रंगेहाथ पकडले. या दोघांनीही बारा हजार रुपयांची लाच मागीतली होती. मात्र, तडजोडीअंती सात हजार रुपये घेताना पकडले.
तक्रारदार यांचे वाडीवर्हे गावातील दोन व्यावसायिक आणि एक घरगुती वीज मीटर बसवून दिले होते. त्याची बक्षिसी म्हणून बारा हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंती सात हजार रुपये देण्याचे ठरले. यासंदर्भात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आल्यानंतर सापळा रचण्यात आला. पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस नाईक अजय गरुड, प्रभाकर गवळी, शीतल सूर्यवंशी यांच्या पथकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अक्षीक्षक शर्मिष्ठा घारगे – वालावलकर, अप्पर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.