फटाके उडवण्याच्या कारणावरून शहरातील पाथर्डी फाटा येथे 28 वर्षीय युवकाची हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. या त्यामुळे नाशिक शहरातील दिवाळी सणाला गालबोट लागले असून पोलिसांनी यातील एका आरोपीला अटक केली आहे.
याबाबत इंदिरानगर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की शहरातील पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या स्वराज्य नगर या ठिकाणी राहणारा गौरव आखाडे ( 28) या युवकाचे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेजारी राहणाऱ्या नागरिकांशी फटाके उडवण्याच्या कारणावरून वाद झाले होते त्यानंतर हा वाद शमला होता परंतु नंतर मंगळवारी गौरव हा त्याच्या घराच्या बाहेर उभा असताना सुमारे दहा ते बारा जणांनचे ओके हातामध्ये तलवारी आणि कुराड घेऊन त्याच्या जवळ आले आणि त्यांनी काही लक्ष देण्याच्या आतच त्याच्यावरती हल्ला केला या हल्ल्यातून त्यांनी सुटका करून तो आपल्या घरात गेला परंतु त्यानंतर त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी पोहोचले यातील एका संस्थेच्या पोलिसांनी ताब्यात घेतली असून बाकीच्या आरोपींचा शोध सुरू आहे.