न्यूझीलंडच्या सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांच्या पक्षाचा विजय झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे
एका X पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले; “नवनिर्वाचित पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांचे सार्वत्रिक निवडणुकीतील त्यांच्या पक्षाच्या झालेल्या विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन. भारत-न्यूझीलंड संबंध अधिक दृढ करण्यासाठी एकत्र कार्य करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
लक्सन यांच्या राष्ट्रीय पक्षाला मिळाली ३९ टक्के मते
न्यूझीलंडमधील सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान ख्रिस हिपकिन्स यांच्या मजूर पक्षाचा पराभव करून क्रिस्टोफर लक्सन यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय पक्षाचा विजय झाला. आता लक्सन नवीन सरकार स्थापन करतील. क्रिस्टोफर लक्सन हे न्यूझीलंडचे पुढील पंतप्रधान म्हणून नियुक्त होतील. मतांच्या आकडेवारीनुसार लक्सन यांच्या राष्ट्रीय पक्षाला सुमारे ३९ टक्के, मजूर पक्षाला २६.९ टक्के, तर ऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटरी (ACT) पक्षाला ९ टक्के मतं मिळाली आहेत. नॅशनल पार्टी ACT पक्षाबरोबर युती करेल अशी अपेक्षा आहे. राष्ट्रीय पक्ष आणि ACT पक्ष यांच्यातील युतीच्या वाटाघाटी येत्या काही दिवसांत सुरू होण्याची अपेक्षा आहे. राष्ट्रीय पक्षानं मध्यम वर्गीय लोकांना दिलासा देण्यासाठी अनेक वर्षांपासूनची महागाई नियंत्रणात आणण्याचं आश्वासन देऊन निवडणुकीत बाजी मारली.