पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, रविवारी सैन्य जवान आणि सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी देशाच्या सीमेवर पोहचलेत. पंतप्रधान दरवर्षी जवानांसोबतच दिवाळी साजरी करतात. त्यानुसार यंदा ते हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे पोहचलेत. यानंतर ते जम्मू-काश्मीरच्या छंब सेक्टरमध्ये जाणार आहेत.
भारतीय सैन्य किंवा जम्मू-काश्मीर प्रशासनाने पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत शनिवारी रात्री उशिरापर्यंत कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी केले नसले तरी संबंधित लष्करी तुकडी त्यांच्या स्वागताच्या तयारीत व्यस्त आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पंतप्रधान मोदी लष्करासोबत दिवाळी साजरी करत आहेत.जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा येथे शनिवारी रात्री भारतीय लष्करातील अधिकारी आणि जवानांनी दिवाळी साजरी केली. आपल्या घरापासून आणि कुटुंबांपासून दूर, सैनिकांनी सीमेवर मेणबत्त्या आणि दिवे लावून दिवाळीचा सण साजरा केला. सैनिकांनी काही छोटे फटाकेही फोडले.