फेडएक्स एक्स्प्रेस (FedEx Express) ही फेडएक्स कॉर्पची (FedEx Corp. (NYSE: FDX)) जगातील सर्वांत मोठ्या एक्स्प्रेस वाहतूक कंपन्यांपैकी एक कंपनी असून, कंपनीने आत ग्राहकांना ऑनलाईन शिपिंगचा अनुभव आणखी चांगला केला आहे. फेडएक्स शिप मॅनेजर (FedEx Ship Manager™) मधील ऑटोमेटेड ई-कॉमर्स सुविधा आता भारतातील छाटे व्यावसायिक आणि ई-कॉमर्स व्यवसायिकांना वापरता येणार आहे. त्यांना आता आपल्या शिपमेंटचे ऑनलाईन व्यवस्थापन करता येणार आहे.
भारतासह ही सेवा ४४ देशांमध्ये आणि AMEA भागातही उपलब्ध आहे. फेडएक्स शिप मॅनेजर (FedEx Ship Manager™) मधील सुविधांमधील या वाढीमुळे व्यावसायिकांना अगदी सोप्या स्टेप्स फॉलो करून आपल्या ऑनलाईन ऑर्डरचे व्यवस्थापन आणि त्याचे शिपमेंट करता येणार आहे. त्यामुळे त्यांचा मॅन्युअली हे सारे करण्यात जाणारा मोठा वेळ वाचणार आहे. शॉपीफाय, बिगकॉमर्स, वूकॉमर्स आणि प्रेस्टशॉप स्टोअर fedex.com च्या फेडएक्स शिप मॅनेजरशी (FedEx Ship Manager™) जोडले गेेले असून ग्राहकांना त्याचा फायदा होणार आहे. येत्या काळात आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सशी आणि मार्केटप्लेसशी जोडले जाणार आहे.
याशिवाय फेडएक्सच्या (FedEx) ग्राहकांना आता –
● त्यांचा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म किंवा मार्केटप्लेस फेडएक्स शिप मॅनेजरशी (FedEx Ship Manager™) जोडून त्यांच्या ऑर्डरची माहिती ऑटोमॅटिक डाऊनलोड करता येणार आहे.
● अनेक ऑर्डर्ससाठी लेबल तयार करणे आणि प्रिंट करणे केवळ एका क्लिकवर असेल आणि त्यांचे ईलेक्ट्रॉनिक ट्रेड कागदपत्र जोडून क्लिअरन्स प्रक्रिया सुरळित पार पाडता येईल.
● ट्रॅकिंग नंबर्स अपडेट करता येईल आणि ऑर्डरचे स्टेटसही पाहता येईल. शिवया खरेददारांना हेही कळेल की त्यांचे ऑर्डर शिप झाले आहे की नाही.
फेडएक्स एक्स्प्रेसचे (FedEx Express) मध्य-पूर्व, भारतीय उपखंड आणि अफ्रिका भागाच्या मार्केटिंग विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष नितीन नवनीत ताटिवाला यांनी सांगितले, डिजिटल बुद्धिमत्तेचा अॅक्सेस देत आम्ही छोटे व्यावसायिक आणि ई-कॉमर्स व्यापाऱ्यांना सक्षम करण्यासाठी कटिबद्ध आहोत. या सुधारित फेडएक्स शिप मॅनेजर (FedEx Ship Manager™) मध्ये अविरत सुरू राहणारी ई-कॉमर्स सेवा आणि सुलभ शिपिंग प्रक्रिया या सुविधांचा समावेश असून, व्यवसायाचा विकास करण्याच्या दृष्टीने आणि स्पर्धेत पुढे राहण्यासाठी फेडएक्स शिप मॅनेजर (FedEx Ship Manager™) अधिक महत्ताची भूमिका पार पाडणार आहे.
फेडएक्स (FedEx) आपल्या ई-कॉमर्स सेवा निर्माण करत असून विविध उपाययोजनांची त्यात भर टाकली जात आहे. फेडएक्स कम्पॅटिबल अँड अलायन्सेस प्रोग्रामच्या माध्यामधून बीटूबी मार्केटप्लेस, दूरपर्यंत माल पोहोचवण्याचा पर्याय, थेट मेसेजची सुविधा आणि फेडएक्स डिलिव्हरी मॅनेजर इंटरनॅशनल आणि पिक्चर प्रूफ ऑफ डिलिव्हरीच्या माध्यमातून थेट मेसेज देण्याची व्यवस्थाही असेल. त्यामुळे ग्राहकांनी ऑर्डर केलेल्या वस्तू त्यांच्यापर्यंत पोहोचवले जाणार आहे.