सीबीआयच्या पथकाने पश्चिम बंगाल आणि सिक्कीममधील सुमारे 50 ठिकाणी छापे टाकले. कोलकाता, दार्जिलिंग आणि सिलीगुडी येथे कारवाई झाली. बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट जारी केल्याप्रकरणी सरकारी अधिकाऱ्यांसह 24 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत मिळालेल्या माहीतीनुसार, या तपासादरम्यान गंगटोकच्या पासपोर्ट ऑफीसमधून गौतम कुमार यांना लाचखोरीच्या प्रकरणात अटक केली आहे. त्यांना 1 लाख 90 हजार रुपयांची लाच घेताना सीबीआयने रंगेहात पकडले आहे. बनावट पासपोर्ट बनवण्याच्या आरोपाखाली सरकारी अधिकारी आणि अन्य व्यक्ती मिळून 24 जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहीतीनुसार, 16 अधिकाऱ्यांसहित 24 असे लोक आहेत जे लाच घेऊन भारतीय नसलेल्या व्यक्तींना खोट्या कागदपत्रांच्या आधारे नकली पासपोर्ट बनवून देत होते. आता सीबीआय कोलकाता, सिलीगुड़ी, गंगटोक आणि आणखी काही ठिकाणी तपास करत आहे. मिळालेल्या माहीतीनुसार, सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने एक व्यक्ती अशा नेटवर्कचा भाग आहे जे नेटवर्क नकली पासपोर्ट बनवून देते. आता यामध्ये आणखी काही संशयित असल्याची माहीती अधिकाऱ्यांनी दिली आहे.