रासायनिक कंपनीतील स्फोटाने दुर्घटनाग्रस्त झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांना जास्तीत जास्त मदत देण्यात येईल, असे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. तसेच दुर्घटनाग्रस्त कंपनीत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ)च्या सुरू असलेल्या मदतकार्याची पाहणी केली.
महाड येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) उद्योग क्षेत्रातील ब्ल्यू जेट रासायनिक कंपनीतील स्फोटाने झालेल्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी भेट दिली. यावेळी ते बोलत होते .यावेळी घटनास्थळावर आमदार भरत गोगावले, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे , जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यासह अग्निशमन पोलीस एनडीआरएफ चे अधिकारी व जवान तसेच कंपनी व्यवस्थापनाचे अधिकारी उपस्थित होते
भेट दिल्यानंतर प्रशासनाकडून व संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.जे व्यक्ती दुर्घटनाग्रस्त आहेत ती नावे जाहीर झाल्यानंतर , त्यांच्या नातेवाईकांना मदत दिली जाणार आहे. यावेळी नातेवाईकांची विचारपूस करून त्यांना दिलासा दिला.
पालकमंत्री श्री सामंत म्हणाले, सकाळी साडे दहाच्या सुमारास ही घटना घडली आणि स्फोट झाल्यानंतर 11 जणांचा शोध लागलेला नाही.काही बाहेर आले असतील अशी शक्यता आहे. त्यांचा शोध सुरु आहे. संबंधित कंपनीच्या मालकाशी देखील चर्चा करून जास्तीत जास्त मदत करण्याचे निर्देश श्री सामंत यांनी यावेळी दिले .
पूर्ण फॅब्रिकेशन वर्क असल्यामुळे स्टीलचं वर्क असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उष्णता निर्माण झालेली आहे. केमिकल क्षेत्रातील आपत्ती असल्यामुळे कामात काही अडचणी येताहेत. या ठिकाणी अजूनही केमिकल असू शकते अशी एनडीआरएफची माहिती आहे. एनडीआरएफने त्यांचं मदत कार्य सुरू आहे.