एका चौदा महिन्याच्या बाळाचा अंगणातील पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्याच्या राजापूर येथे घडली. अदिक अतुल शहारे असे या मृत बाळाचे नाव आहे.
यासंदर्भातील माहितीनुसार अतुल शहारे हा बाहेर जाताना काही वेळासाठी अद्विकला शेजाऱ्याच्या घरी नेऊन ठेवलं पण अद्विक शेजाऱ्याच्या घरून आपल्या घरी परत आला होता. काही वेळातच अतुल परत आला अद्विक कूठे आहे. अशी विचारणा शेजाऱ्याला करु लागला. व मुलाचा शोध घेतला असता तो दिसला नाही शेवटी पण्याच्या टाकीतून पाणी काढत असताना अद्विक तरंगताना आढळला. लगेच त्याला डॉक्टरकडे घेऊन गेले असताना डॉक्टरांनी त्याला मृत घोषित करण्यात आले.