जीआयपी रेल्वेचा उत्तराधिकारी मध्य रेल्वे आपल्या स्थापनेच्या दिवशी ७२ गौरवशाली वर्षे पूर्ण करत आहे आणि ०५.११.२०२३ रोजी मध्य रेल्वेचे ७३वे वर्ष सुरू होत आहे. आशियातील (आणि भारतातील) पहिली ट्रेन मुंबई ते ठाणे दरम्यान शनिवार, दि. १६ एप्रिल १८५३ रोजी धावली. जसजशी वर्षे उलटली, तसतशी ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेचा विस्तार होत गेला. सन १९०० मध्ये ग्रेट इंडिया पेनिन्सुला (GIP) रेल्वे कंपनीमध्ये इंडियन मिडलँड रेल्वे कंपनीचे विलीनीकरण झाल्यानंतर, तिची सीमा उत्तरेला दिल्ली, ईशान्येला कानपूर व अलाहाबाद आणि पूर्वेला नागपूरपासून दक्षिण-पूर्वेला रायचूरपर्यंत वाढवण्यात आली. अशा प्रकारे, बॉम्बे द्वारे भारताच्या जवळजवळ सर्व भागांशी संपर्क साधला गेला. G.I.P चे रेल्वेमार्ग १,६०० मायलेज होती. (२,५७५ किमी)
दि. ५ नोव्हेंबर १९५१ रोजी निजाम राज्य, सिंधिया राज्य आणि ढोलपूर राज्य रेल्वे यांचे एकत्रीकरण करून मध्य रेल्वेची स्थापना करण्यात आली. सध्या मध्य रेल्वेवर मुंबई, भुसावळ, नागपूर, सोलापूर आणि पुणे असे ५ विभाग आहेत. मध्य रेल्वेचे नेटवर्क महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटक राज्यांमध्ये ४,२१९ मार्ग किमीवर पसरलेले आहे आणि एकूण ४७१ स्थानके आहेत.
मध्य रेल्वेने गेल्या ७१ वर्षांत अनेक कामगिरी सर्वप्रथम केली आहे. त्यापैकी काही उल्लेखनीय कामगिरी आहेत:
पहिली शताब्दी एक्सप्रेस,
पहिली जन शताब्दी एक्सप्रेस,
पहिली तेजस एक्सप्रेस हि काही नावे आहेत.
मध्य रेल्वे सतत विकासात आघाडीवर आहे. मूळ लोडिंग जे निर्मितीच्या वेळी १६.५८ दशलक्ष टन होते, ते आता २०२२-२३ मध्ये ८१.८८ दशलक्ष टन झाले आहे. सन २०२३-२४ मध्ये, मध्य रेल्वेने ४९.०२ दशलक्ष टन गाठले जे एप्रिल-ऑक्टोबर मालवाहतूक लोडिंगमधील सर्वात चांगले आहे. उपनगरीय सेवा देखील १९५१ मधील ५१९ वरून १८५० (मुंबई १८१० आणि पुणे ४०) वर्ष २०२३ मध्ये वाढल्या आहेत.
मुंबईची उपनगरीय सेवा ही मुंबईची जीवनवाहिनी आहे. मध्य रेल्वेने उपनगरीय नेटवर्कमध्ये सातत्याने वाढ केली असून आज चार कॉरिडॉर आहेत. ३ डब्यांपासून सुरू झालेल्या उपनगरीय सेवा हळूहळू ९ डब्यांच्या, १२ डब्यांच्या आणि १५ डब्यांच्या काही सेवांपर्यंत वाढल्या आहेत. प्रवास अधिक सोयीस्कर आणि आरामदायी करण्यासाठी वातानुकूलित उपनगरीय सेवाही सुरू करण्यात आल्या आहेत. याशिवाय नवीन रेल्वे लाईन निर्माण करणे, दुहेरीकरण, तिसरी व चौथी लाईन, विद्युतीकरण, पूल बांधणे, नवीन स्थानके बांधणे आदी पायाभूत सुविधांची कामे वेगाने सुरू आहेत.
मध्य रेल्वेने मान्सूनपूर्व मोठ्या प्रमाणात कामे केली असून त्यामुळे मुसळधार पाऊस असूनही उपनगरीय गाड्या धावत होत्या. मध्य रेल्वेने या वर्षात आतापर्यंत विक्रमी १४७.७७ किमीचे मल्टी ट्रॅकिंग पूर्ण केले आहे. वर्ष २०१९ मध्ये अभूतपूर्व पाऊस आणि नेरळ-माथेरान सेक्शनवर झालेल्या नुकसानीनंतर, मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी दि. २२.१०.२०२२ पासून पुन्हा सुरू झालेले विभाग आणि सेवा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर काम केले आहे. मध्य रेल्वे आपल्या प्रवाशांना आणि ग्राहकांना सुरक्षित आणि वक्तशीर सेवा देण्यासाठी वचनबद्ध आहे.