जालना: जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील पाथरवाला येथील सुरेश गणेश जाधव याने पेटवून घेतले आहे. त्याचे आई वडील देखील वाचविण्यासाठी गेल्याने तिघेही भाजले आहेत. गणेश जाधव आणि मंगल गणेश जाधव यांच्या अकरावीत शिकणाऱ्या युवा मुलाने मराठा आरक्षण मिळावे यासाठी आज राहत्या घरी सात वाजता पेटवून घेतले आहे,असे बोलले जात आहे.
गंभीररित्या भाजलेल्या या मुलाची तब्येत खूप खराब असल्याने पुढील उपचारासाठी त्याला जालना येथून छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात येत आहे. सुरज गणेश जाधव याने सकाळी घराबाहेर उभे राहून जाळून घेतले. त्याची आई त्याला वाचवण्यासाठी गेली असता ती देखील ६० टक्के भाजली आहे तर सूरज ही ६० टक्के भाजला आहे.
तीन महिने झाले परंतु सरकारने अद्याप आरक्षणबद्दल निर्णय घेतला नाही त्यामुळे मी जाळून घेतल्याचे सुरेश सांगतोय. तर त्याची आई मंगल यांनी या विधानाला दुजोरा देत जर मुलाच्या जीवच काही बरे वाईट झाले तर त्याला सरकार जबाबदार राहील. सरकारने लवकरात लवकर मराठा आरक्षण द्यावे असेही त्या म्हणाल्या.