मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबत कार्यपध्दतीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांकडून त्यांच्याकडील उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसूली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी जुने अभिलेखे जिल्हाधिकारी कार्यालयातील स्थापित विशेष कक्षात 21 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी मा. न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीची कार्यकक्षा संपूर्ण महाराष्ट्र राज्य करण्यात आली आहे. या समितीचा विभागनिहाय दौरा प्रसिध्द करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांकडून त्यांच्याकडील उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसूली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी जुने अभिलेखे समितीस संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयातील स्थापित विशेष कक्षात 21 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.