माढा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून ‘आमचं ठरलंय..’ असं म्हणत मोहिते पाटलांनी पुन्हा जुन्या – नव्या दोस्तांचा दोस्ताना वाढविला आहे. मोहिते पाटलांच्या भूमिकेमुळे माढा मतदारसंघात निवडणुकीपूर्वीच चुरस निर्माण केली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी माढा मतदारसंघांमध्ये मोहिते पाटील समर्थकांनी धैर्यशील मोहिते पाटील यांचे फोटो लावून ‘आमचं ठरलंय..खासदारचं’ अशा पोस्ट सोशल मीडियामधून मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध केल्या आहेत. माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक – निंबाळकर यांचे व मोहिते पाटलांचे सख्य जगजाहीरच आहे. लोकसभा निवडणुकीत आता कोणत्याही प्रकारे माघारी नाही असेच मोहिते पाटील समर्थक बोलत आहेत.