पावसाअभावी यंदा रब्बीच्या जिल्ह्यात चार लाख ६० हजार ९१८ हेक्टर (ऊस वगळून) क्षेत्रापैकी आतापर्यंत केवळ दोन लाख ३७ हजार ६०२ हेक्टरवरच (५१.५५ टक्के) पेरणी झाली आहे. ज्वारी, गहू, हरभरा व गळीत धान्य आणि कडधान्याची पेरणी खूपच कमी झाल्याची वस्तुस्थिती कृषी विभागाच्या आकडेवारीवरून समोर आली आहे.
रब्बीचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सोलापुरात ४३ साखर कारखाने आहेत. रब्बीच्या जिल्ह्यात तब्बल दीड लाख हेक्टरवर उसाची लागवड झालेली आहे. हमीभावाची वाट न करता कमी खर्चात व कमी जोखमेत हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकरी उसाकडे पाहू लागला आहे. ना अवकाळी ना अतिवृष्टीची चिंता, अशा या उसाला फक्त दुष्काळातच सर्वाधिक फटका बसतो.