युक्त राष्ट्र संघाने २०२३ हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित केले असून उप मुख्यमंत्री व तत्कालीन वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पामध्ये “महाराष्ट्र श्री अन्न अभियाना”ची घोषणा केली. या अभियानासाठी तब्बल २०० कोटी रुपयांची तरतूद करून सोलापूर येथे “श्री अन्न उत्कृष्टता केंद्र” स्थापन करण्याची तरतूद शासनाने केली होती. मात्र सत्तेत अजित पवार गट सामील झाला आणि आता या उत्कृष्टता केंद्राचे प्रशिक्षण केंद्रचे ठिकाण सोलापूर मधुन थेट बारामतीला हलवण्याचा निर्णय झाला आहे. याला सर्वस्वी भारतीय जनता पार्टी आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील जबाबदार असल्याचे आरोप सोलापूर जिल्ह्य काँग्रेस कमिटीचे जिल्हा कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी केला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सदर केंद्र सोलापूरसाठी जाहीर केले होते परंतु भाजपाच्या सोलापूर पालकमंत्रीसह इतर नेत्यांना हे केंद्र इथे टिकवण्यात सपशेल अपयश आले आहे. सदरचे केंद्र शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत होते. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये भाजपा आमदार आणि खासदार विषयी प्रचंड रोष पसरला आहे. त्यामुळे सदर केंद्र इथून जाण्यास सर्वस्वी भाजप लोकप्रतिनिधी आणि पालकमंत्री जबाबदार असल्याचा आरोप देखील विजयकुमार हत्तुरे यांनी केला आहे
Shilpa Shetty : व्हायरल स्टार्सची सुपरस्टारकडे झेप! सुपर डान्सर मंचाची मोठी संधी
छत्रपती संभाजी नगर : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘सुपर डान्सर’ या त्यांनीच विकसित केलेल्या डान्स रियालिटी शो चे चार वर्षांच्या विश्रांतीनंतर...