रेल्वे मंत्रालयाने ११०२५/ ११०२६ पुणे – भुसावळ एक्स्प्रेस दि. १३.११.२०२३ पासून दौंड कॉर्ड लाइन मार्गे, अहमदनगर आणि मनमाड मार्गे अमरावती पर्यंत वाढवली आहे. आणि ११०११/ ११०१२ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – धुळे एक्स्प्रेस ही नवीन ट्रेन देखील सुरू करीत आहे.
ए. ११०२५/ ११०२६ पुणे – अमरावती दैनिक एक्सप्रेस
गाडी क्र. ११०२५ पुणे – अमरावती एक्स्प्रेस दि. १३.११.२०२३ पासून पुणे येथून ११.०५ वाजता सुटेल आणि अमरावती येथे दुसऱ्या दिवशी ००.५५ वाजता पोहोचेल.
गाडी क्र. ११०२६ अमरावती – पुणे एक्स्प्रेस दि. १३.११.२०२३ पासून अमरावती येथून २२.५० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ११.२५ वाजता पोहोचेल.
थांबे : उरुळी, दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, कजगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, बोदवड, मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, बडनेरा.
संरचना : १७ डब्बे – एक वातानुकूलित चेअर कार, एक शयनयान, १३ साधारण (नॉन एसी) चेअर कार ज्यापैकी ७ आरक्षित आणि ६ अनारक्षित, २ सामान्य द्वितीय श्रेणीसह ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार
११०२५/११०२६ पुणे- अमरावती एक्स्प्रेसच्या वळण आणि विस्तारासह, ट्रेन क्र. ०११०१/०११०२ पुणे – अमरावती – पुणे विशेष पुणे येथून आणि अमरावती येथूनची सेवा दि. १३.११.२०२३ पासून रद्द केली जाईल.
बी. ११०११/११०१२ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – धुळे दैनिक एक्सप्रेस
गाडी क्र. ११०११ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – धुळे एक्स्प्रेस दि. १२.११.२०२३ पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून १२.०० वाजता सुटेल आणि धुळे येथे त्याच दिवशी २०.५५ वाजता पोहोचेल.
गाडी क्र. ११०१२ धुळे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस दि. १२.११.२०२३ पासून धुळे येथून ६.३० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याच दिवशी १४.१५ वाजता पोहोचेल.
थांबे : दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, निफाड, लासलगाव, मनमाड जंक्शन, नांदगाव, चाळीसगाव, जामधा, शिरूड.
संरचना : १६ डब्बे – एक वातानुकूलित चेअर कार, १३ साधारण (नॉन एसी) चेअर कार (५ आरक्षित आणि ८ अनारक्षित), १ साधारण द्वितीय श्रेणीसह ब्रेक व्हॅन आणि एक जनरेटर कार.
दि.१२.११.२०२३ पासून ११०११/११०१२ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – धुळे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस विशेष ट्रेन, ०१०६५/०१०६६ दादर – धुळे – दादर विशेष आणि ०२१०१/०२१०२ दादर – मनमाड – दादर विशेष ट्रेन दि. १२.११.२०२३ पासून बंद केल्या जातील.
आरक्षण : ११०२५/ ११०२६ पुणे – अमरावती दैनिक एक्सप्रेस आणि ११०११/ ११०१२ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – धुळे दैनिक एक्सप्रेससाठीचे बुकिंग आधीच सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू आहे. तपशीलवार वेळ आणि थांब्यांसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस