सोयगाव,दि.३ नोव्हेंबर
सोयगाव तालुक्यातील निमखेडी येथे तालुका कृषी अधिकारी एस.जी.वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून रब्बी हंगामात पिकांना व उन्हाळ्यात जनावरांना पाणी पिण्यासाठी उपलब्ध व्हावे याकरिता लोकसहभागातून कृषी विभागामार्फत तालुक्यात वनराई बंधाऱ्याचे काम हाती घेण्यात आले आहे काही कामे चालू असून काही कामे पूर्ण झाली आहेत.या कामी गावातील शेतकरी बंधूंनी कृषी विभागासोबत उत्स्फूर्त सहभाग घ्यावा व भविष्यात होणाऱ्या पाणीटंचाईवर मात करता यावी यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा तालुका कृषी अधिकारी एस.जी.वाघ यांनी व्यक्त केली.
f4de5y