महापालिकेवर सत्ता कोणाचीही असो, पण त्यांना सोलापूरकरांना मागील २३ वर्षांपासून नियमित पाणी देता आलेले नाही, हे विशेष. १९९९ पर्यंत नियमित मिळणारे पाणी पुढच्याच वर्षी एक दिवसाआड झाले आणि त्यावेळी संभाव्य अंदाज घेऊन कोणीही ठोस नियोजन केले नाही आणि आता शहरात चार ते पाच दिवसाआड पाणी मिळते. त्यामुळे ‘कोठे नेऊन ठेवलंय सोलापूर माझं’ असा प्रश्न विचारण्याची वेळ सोलापूरकरांवर आली आहे.
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त राजेशकुमार यांच्या कार्यकाळात सोलापूरला दररोज पाणी मिळायचे. पण सन २०००मध्ये एक दिवसाआड पाणी मिळू लागले. तरीदेखील सोलापूरकर गप्प होते. पण कालांतराने शहराचा विस्तार झाला. लोकसंख्या वाढली आणि जुनाट पाइपलाइनवरील भार वाढल्याने प्रत्येक परिसराला दररोज किंवा एक-दोन दिवसाआड पाणी देणे अशक्य झाले. २३ वर्षांत वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी महापालिकेवर राज्य केले.