इंदापूर-भिगवण परिसरातून खरेदी केलेल्या दोन पिस्टन (बंदूक) जास्त दराने सोलापुरात विक्रीसाठी आणलेल्या तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले आहे. सुनील लक्ष्मीकांत अकोले (वय ३०, रा. न्यू सुनील नगर, एमआयडीसी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
सोलापूर शहरात एका तरुणाने विक्रीसाठी परदेशी बनावटीचे दोन पिस्टन आणल्याची खबर पोलिसांना लागली. त्याअनुषंगाने पोलिस आयुक्त डॉ. राजेंद्र माने, उपायुक्त विजय कबाडे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजन माने यांना सूचना करण्यात आल्या. त्यानुसार त्यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला आदेश दिले. पोलिस उपनिरीक्षक विक्रम रजपूत यांनी खबऱ्यांचे नेटवर्क अलर्ट केले आणि पथकातील पोलिस हवालदार राकेश पाटील यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली. त्यानुसार अंदाजे ३० वर्षीय तरुण परदेशी बनावटीचे पिस्टन विक्रीसाठी सुनील नगरातील पाण्याच्या टाकीजवळ येणार असल्याचे समजले.