राज्यात प्रतिबंध असलेला सुगंधी पान मसाला तंबाखूची बेकायदेशीर वाहतूक करताना आढळल्याने सलीम मौलाली करणकोट (वय-४३,रा. सागर चौक, जुना विडी घरकुल, सोलापूर) याच्या विरोधात अन्न औषध व प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त रेणुका पाटील यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
घटनेच्या हकीकत अशी की, आरोपी सलीम करणकोट हे ऑटो रिक्षा क्र.एमएच.१३.बीवी.१९५४ मधून पान मसाला सुगंधी तंबाखू घेऊन स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वाहतूक करताना आढळल्याने शांती चौक ते अशोक चौकाकडे जाणाऱ्या रोडवर त्यांना पकडले. या प्रतिबंधित अन्नपदार्थाचे पुरवठादार कोण आहेत? हा माल कुठून विकत आणला ? याबाबत चौकशी करण्याकरता त्यांच्यावर फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक बादोले हे करत आहेत.