सांगोला तालुक्यातील पाचेगाव बु. येथे टेंभूचा कॅनॉल फुटून शेतकऱ्यांच्या शेतीचे, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कॅनॉल का व कशामुळे फुटला याबाबत चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केली आहे.
टेंभू योजनेचा सांगोला तालुक्यातील पाचेगाव बुद्रुक परिसरात कॅनॉल फुटल्याने या पाण्याच्या प्रवाहात शेती, पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. कॅनोन फुटल्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे.याबाबत ते पुढे म्हणाले की, शेतामध्ये असलेले पिके अक्षरशः वाहून गेल्याने शेतकऱ्यांची न भरून येणारे आर्थिक तोटा झाला आहे. या कॅनॉल मधूनच शिरभावी पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन गेल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे परिसरात त्या ठिकाणी पाणी झिरपत असल्याची तोंडी तक्रार कॅनॉलच्या अधिकाऱ्यांना दिली होती.