दोन हजार रुपयांची नोट आता १ ऑक्टोबरपासून चलनातून बाद होणार आहे. नोटा बदलून घेण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) मुदत दिली आहे. दरम्यान, आतापर्यंत सोलापूर शहर-जिल्ह्यातून २७३ कोटी ६४ लाख ३० हजार रुपये (१३ लाख १८ हजार २१५ नोटा) बॅंकांमध्ये जमा झाले आहेत.
‘आरबीआय’ने १९ मे रोजी दोन हजारांची नोट चलनातून बाद करण्यासंदर्भातील निर्णय जाहीर केला. नोटाबंदीनंतर नोव्हेंबर २०१६मध्ये दोन हजार रुपयांची नोट चलनात आली होती. दोन हजारांच्या नोटांची छपाई झाली, पण त्या नोटा चलनातून कमी झाल्या आहेत.या पार्श्वभूमीवर नागरिकांना जूनपासून दररोज दहा नोटा बदलून घेण्याची मर्यादा घालून देण्यात आली. आजवर सोलापूरच्या एसबीआय व बॅंक ऑफ इंडियाच्या ट्रेझरीत २७ सप्टेंबरपर्यंत दोन हजारांच्या २७३.६४ कोटींच्या नोटा जमा झाल्या आहेत.