महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यालयात ठाणे राष्ट्रवादी महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली.
महाराष्ट्र राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष, खासदार सुनील तटकरे, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांच्या मार्गदर्शनाखाली, महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते व ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष आनंद परांजपे, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, ठाणे शहर (जिल्हा) राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा वनिताताई गोतपागर यांच्या उपस्थितीत ठाणे शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या या नियुक्त्या करण्यात आल्या.
१४७-कोपरी पाचपाखडी महिला विधानसभा अध्यक्षपदी सुवर्णा खिल्लारी, १४६-ओवळा माजीवडा मतदार संघाच्या अध्यक्षपदी सुनिता शशिकांत धेंडे तर राणी कटार नवरे यांची वर्तकनगर महिला ब्लाक अध्यक्षपदी, अरूणा पेढारे यांची उथळसर ब्लॉक अध्यक्षपदी, उज्वला गडकर, श्यामल दाभाडे, मनिषा कांबळे यांची प्रभाग अध्यक्षपदी, लोकमान्य-सावरकरनगर महिला ब्लॉक अध्यक्षपदी सुजाता संतोष घाग यांना, अजित पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, हसन मुश्रीफ, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष व खासदार सुनिल तटकरे, राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेश अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी सर्व नवीन महिला पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.