Sunday, September 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

भारतीय नौदलाकडून रविवारी दुसऱ्या मुंबई हेरिटेज रनचे आयोजन…..

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 5, 2023
in maharashtra
0
भारतीय नौदलाकडून रविवारी दुसऱ्या मुंबई हेरिटेज रनचे आयोजन…..
0
SHARES
17
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

भारतीय नौदलाच्या पश्चिमी नौदल कमांडने दुसऱ्या इंडियन नेव्ही मुंबई हेरिटेज रन-2023 चे आयोजन करत असल्याची घोषणा केली आहे. निरोगी जीवनशैली आणि दक्षिण मुंबईचा समृद्ध वारसा याबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या उद्देशाने सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणण्यासाठी रविवारी 6 ऑगस्ट 2023 रोजी या हेरिटेज रनचे आयोजन होत आहे.

ऐतिहासिक परिसर आणि असाधारण निओ-गॉथिक शैलीचे दर्शन घडवणाऱ्या इमारतींच्या वैशिष्ट्यांसह आकर्षक वास्तुरचनांच्या सौंदर्यासाठी दक्षिण मुंबई वारसा जिल्हा ओळखला जातो. मुंबईतील सर्वाधिक जुन्या वास्तुंपैकी काही वास्तूंचे संरक्षक असलेल्या भारतीय नौदलाला मुंबईच्या या वारशाचे संवर्धन करण्याचा आणि त्याविषयी जागरुकता निर्माण करण्याचा अतिशय अभिमान आहे. इंडियन नेव्ही मुंबई हेरिटेज रन-2023 म्हणजे ऐतिहासिक वारसा असलेल्या या जिल्ह्यातील वारसास्थळांकडे लक्ष वेधून घेणारा आणि या शहराच्या ऐतिहासिक भूतकाळाशी अधिक जास्त प्रमाणात जोडून घेण्यासाठी सहभागींना प्रोत्साहित करणारा आणि नागरिकांमध्ये या वारशाबाबत अभिमानाची आणि आपलेपणाची भावना निर्माण करणारा आणि या प्रक्रियेदरम्यान सहभागी आणि प्रेक्षक यांना सारख्याच प्रमाणात अविस्मरणीय अनुभव देणारा एक मंच आहे.

13 ऑगस्ट 2022 रोजी इंडियन नेव्ही मुंबई हेरिटेज रनचे पहिल्यांदा आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये ऐतिहासिक वारसा आणि तंदुरुस्ती प्रेमी यांनी सारख्या प्रमाणात एकत्र सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली आणि त्यामध्ये 5000 पेक्षा जास्त स्पर्धकांनी नोंदणी केली होती. या रनमध्ये सहभागींना धावण्याच्या मार्गावर 37 वारसा स्थळांचे अवलोकन करण्याचा अविस्मरणीय अनुभव मिळाला. शहराचा मानबिंदू असलेल्या गेटवे ऑफ इंडियाजवळ या दौडीचा समारोप झाला, ज्या ठिकाणी जमा झालेल्या सहभागींनी मुंबईचा अभिमान असलेल्या या वास्तूच्या परिसराच्या सौंदर्याचा आनंद घेतला आणि त्याची प्रशंसा केली.

इंडियन नेव्ही मुंबई हेरिटेज रन-2023 साठी यंदा 6500 धावपटूंनी नोंदणी केली आहे. ही दौड 10 किमीच्या ‘वरुण रन’ आणि 5 किमीच्या ‘समुद्र रन’ या दोन वेगवेगळ्या अंतरांच्या श्रेणींमध्ये आयोजित होणार आहे. अतिशय काळजीपूर्वक रचना करण्यात आलेल्या या दौडीच्या मार्गावर सहभागींना या ऐतिहासिक स्थळांदरम्यान दक्षिण मुंबईतील अद्भुत वास्तुरचना आणि सांस्कृतिक स्थळांचे दर्शन घडणार आहे. सर्व धावपटूंची सुरक्षा आणि त्यांचा आनंद सुनिश्चित करण्यासाठी भारतीय नौदलाने व्यावसायिक शर्यत व्यवस्थापन भागीदार, अनुभवी वैद्यकीय पथके आणि स्वयंसेवकांची मदत घेतली असून त्यांना या दौडीच्या मार्गावर जागोजागी सहभागींना मदत करण्यासाठी त्याचबरोबर प्रोत्साहन देण्यासाठी तैनात केले जाणार आहे. या भागीदारींमधून मुंबईची भावना आणि शहराच्या समृद्ध वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याचे प्रयत्न अधोरेखित होत आहेत.

Post Views: 78
Previous Post

अजित पवार यांच्या हस्ते ठाणे राष्ट्रवादी महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान…..

Next Post

सैनिकांमुळेच आपण सुरक्षित – आदिती तटकरे

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
सैनिकांमुळेच आपण सुरक्षित – आदिती तटकरे

सैनिकांमुळेच आपण सुरक्षित - आदिती तटकरे

ताज्या बातम्या

असा रंगला दहीहंडीचा सोलापुरातल्या बाळीवेसेत उत्सव #viral #solapurnews #aajsolapur #news

September 5, 2026
विराट करिअर अकॅडमीची ६ पदकांची कमाई 

विराट करिअर अकॅडमीची ६ पदकांची कमाई 

September 5, 2026
कर्करोगग्रस्त शिक्षक लखन कांबळे यांना दीड लाखांच्या आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द

कर्करोगग्रस्त शिक्षक लखन कांबळे यांना दीड लाखांच्या आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द

September 5, 2026

तरुणाई नशेच्या विळख्यात, आडोशाच्या ठिकाणी नशा पार्टीचा वाढतोय धोका

September 5, 2026
पावसाअभावी संकटात सापडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत द्या

पावसाअभावी संकटात सापडलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तातडीने शासकीय मदत द्या

September 5, 2026

यूपीएल कंपनी माळशिरस तालुक्यात डाळिंब ऊस केळी पिकाचे प्रात्यक्षिक प्लॉट राबवणार – वरूण श्रॉफ

September 5, 2026

शिक्षक हे राष्ट्रनिर्मितीचे खरे शिल्पकार — डॉ. संजयकुमार भोसले

September 5, 2026

वारीच्या स्वच्छतेवर साडेतीन कोटींचा खर्च;  शौचालये, सफाईचा हिशेब कागदावरच?

September 5, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1168637

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!