पत्नीच्या मसाजसाठी महिलेला घरी बोलवून तिच्याशी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी मनपा आरोग्य निरीक्षक नागेश धरणे (रा.उमा नगरी,जुनी मिल कंपाऊंड) याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत पीडित महिलेने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.पीडिता ही मसाजचे काम करते.त्यामुळे त्याला मसाजचे चांगले अनुभव आहे.मसाज करून,आणि एका सरकारी कार्यालयात नोकरी करून उपजीविका चालवत असल्याची माहिती पीडित महिलेने पोलिसांना दिली आहे.
दरम्यान संशयित आरोपी नागेश धरणे हा सोलापूर महानगरपालिकेत आरोग्य निरीक्षक या पदावर कार्यरत आहे. संशयित आरोपी नागेशच्या पत्नीला अस्थमाचे त्रास आहे. आजारी पत्नीचे मसाज करावयाचे असल्याने नागेश हा पीडितेला पत्नीच्या मसाजसाठी 11 मार्च रोजी दुपारी पावणे एकच्या सुमारास घरी बोलावले होते.
संशयित आरोपी हा सोलापूर महानगरपालिकेत आरोग्य निरीक्षक असल्याने पीडित महिलेने विश्वास करत त्याच्या घरी गेली होती.११ मार्च रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास मसाज करण्यासाठी पीडित महिला गेली.पण त्यावेळी नागेशची पत्नी घरात नव्हती.तिने तुमची पत्नी कुठे आहे असे विचारले असता,त्याने सोफ्यावर बसा असे सांगितले घटनेवेळी संशयित आरोपी नागेशच्या घरात त्याची वृद्ध आई होती.आईला दुसऱ्या मजल्यावरील खोलीत सोडून खाली आला. सोफ्यावर बसून अश्लील कृत्य करण्यास सुरुवात केली.
पीडित महिलेच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले. ही माहिती पीडितेने आपल्या घरी येऊन पतीला सांगितली. त्यानंतर याप्रकरणी पीडितेने याबाबत पोलिस फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपी नागेश धरणे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.