देगलूर बिलोली मतदारसंघ हा आंध्र कर्नाटक या दोन्ही राज्याच्या सीमेलगत आहे माझ्या मतदारसंघात या अर्थसंकल्पात कोणतीच मोठी तरतूद केलेली जाणवत नाही. मी सत्ताधारी पक्षाचा नसल्याने माझ्या मतदार संघातील कामांना आजही स्टे दिला जात असेल तर मग तेलंगणा राज्यात समाविष्ट का होऊ नये ? असा प्रश्न मतदार संघातील नागरिकात निर्माण होत आहे आहे.
तेलंगणा आमच्या राज्यातलं पाणी पळून नेते मांजरा नदीत जॅकवेल खोदून शेतीसाठी पाणी देते माझ्या मतदारसंघात पाण्याची पातळी खोल जात आहे त्यामुळे भविष्यात पिण्याच्या पाण्याचा प्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे ही रोखलं पाहिजे .
सन 2019 मध्ये 100 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयासाठी मान्यता देऊन ते पूर्ववत करा. शेतकऱ्यांना त्यांच्या निर्माण होणाऱ्या विविध संकटांच्या अनुषंगाने 12 तास दिवसा वीज उपलब्ध करून देण्यात यावी.नाफेड मार्फत हरभरा खरेदीची नोंदणी प्रक्रिया लवकर सुरुवात व्हावी . ओबीसी बांधवांच्या घरकुलासाठी अध्याय आदेश काढावे.
घरकुलासाठी अभियानाच्या शासन निर्णयामध्ये वाळू उपलब्ध करून देण्याबाबत कळविले असून सुद्धा तसिलदार वाळू उपलब्ध करून देत नाही परिणामी घरकुल लाभार्थ्यांना वाळूची दुप्पट रक्कम देऊन वाळू उपलब्ध करून घ्यावी लागते त्यामुळे घरकुल मंजुरी सोबतच त्यांना ५ ब्रास वाळू उपलब्धतेचे प्रमाणपत्र देण्यात यावे. असे देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापुरकर यांनी अधिवेशनामध्ये अध्यक्ष महोदयांना विनंती केली.