ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या जंगल सफारी बुकिंग मध्ये सुमारे १२ कोटी १५ लाख ५० हजार ८३१ रुपयांच्या रकमेच्या अपहर प्रकरणी चंद्रपूर वाइल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशनच्या दोघा संचालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
ताडोबाच्या जंगल सफारीचे १० डिसेंबर २०२१ ते १७ ऑगस्ट २०२३ दरम्यान ऑनलाइन बुकिंग करण्याकरिता चंद्रपूर येथील अभिषेक विनोद कुमार ठाकूर व रोहित विनोद कुमार ठाकूर यांचे चंद्रपूर वाइल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशनच्या व ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान यांच्या दरम्यान” सर्विस लेव्हल एग्रीमेंट” द्वारे अटी व शर्तीवर कायदेशीर करार झाला होता. परंतु सदर आरोपीत कंपनी- संस्थेच्या भागीदारांनी करारनाम्यातील अटी व शर्तींचे उल्लंघन केले असल्याची तक्रार ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे विभागीय वनाधिकारी सचिन उत्तम शिंदे यांनी दिली.
ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान चंद्रपूरचे मागील सुमारे साडे तीन वर्षाचे ‘ऑडिट’ करण्यात आले. त्यानुसार सदर कालावधीमध्ये आरोपीत कंपनीने ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान यास २२ कोटी ८० लाख ६७ हजार ७४९ रुपये देणे होते, पण त्यांनी १० कोटी ६५ लाख १६ हजार ९१८ रुपये भरणा केला. पण सफारीची उर्वरित रक्कम प्रतिष्ठानाकडे भरणा न करता अटी व शर्तीचे उल्लंघन केल्याने रकमेचा शासकीय रकमेचा अपहार केला अशी तक्रार दिली. या तक्रारीवरून स्थानिक रामनगर पोलीस स्थानकात कंपनीच्या दोन्हीही दोघा संचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.