Wednesday, August 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

देशाच्या ‘सर्वोच्च, सर्वोत्तम’ विकासाला मोदी सरकारचे प्राधान्य – खासदार डॉ. अनिल बोंडे

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 19, 2023
in solapur
0
देशाच्या ‘सर्वोच्च, सर्वोत्तम’ विकासाला मोदी सरकारचे प्राधान्य – खासदार डॉ. अनिल बोंडे
0
SHARES
44
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

देशातील गोरगरिब नागरिक, युवा, महिला, व्यापारी-उद्योजक, शिक्षण, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विदेश निती, पर्यावरण संरक्षण, देशातील अंतर्गत-बाह्य सुरक्षा इत्यादींसह डिजीटल क्षेत्रातील आव्हाने सक्षमपणे पेलत आहेत. त्यावर योग्य, लोकभिमूख, विश्वासहार्य धोरणे तयार करून देशाला जागतिक पातळीवर अग्रेसर ठेवण्याचे काम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार करत असल्याची माहिती राज्यसभेचे खासदार तथा अमरावती भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल बोंडे यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत दिली. तर विरोधी पक्षावर जोरदार हल्ला चढवित देशाच्या विकासात्मक कामांमध्ये आडकाठी आणण्याचे काम होत असल्याचेही ते म्हणाले.

केंद्र सरकारचे पावसाळी अधीवेशन नवी दिल्ली येथे 20 जुलै ते 11 ऑगस्ट या काळात पार पडले. एकूण 17 दिवस कामकाज चालणाऱ्या या संपूर्ण अधिवेशनामध्ये देशातील जनतेच्या हितासाठी घेतल्या निर्णयाची, कामकाजाची माहिती देण्यासाठी खासदार डॉ.अनिल बोंडे यांच्याकडून पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. पत्रकार परिषदेला भाजपा माजी शहराध्यक्ष किरण पातूरकर, प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी आदी उपस्थित होते.

दरम्यान माहिती देताना त्यांनी सांगितले की, संसदेची पावसाळी अधिवेशन 2023 पूर्णपणे यशस्वी झाले आहे. अधिवेशनाच्या प्रारंभी विरोधकांनी मणिपूर येथे झालेल्या दुर्दैवी घटनेच्या आडून संसदेत गोंधळ निर्माण करून संसदेचे कामकाज प्रभावीत करण्याचा प्रयत्न केला. देशातील जनतेला भ्रमित करण्याचा हा प्रयत्न देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकारने हाणून पाडला. अधिवेशन काळात सरकारने सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. यातून सामान्य नागरिकांच्या विकासाच्या त्यांच्या हितार्थ एकनिष्ठ व कर्तव्यबद्ध असलेल्या सरकारच्या कामकाजाची जाणीव होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाचा मूलमंत्र नागरिकांसमोर ठेवून भारताला अमृत काळाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी परिश्रम करीत आहेत. अधिवेशनकाळात लोकसभा आणि राज्यसभेत एकूण 25 सरकारी विधेयक प्रस्तुत करण्यात आली. 23 विधायक दोन्ही सभागृहात पारित झाले. तर 7 विधेयक 11 ऑगस्टपर्यंत भारताच्या राज्य पत्रात अधिसूचित केले जाणार असल्याचे डॉ. बोंडे यांनी सांगितले. वसाहतवादी फौजदारी कायद्यांना रद्द करण्यासाठी व अमृत काळात आवश्यकतेप्रमाणे सुधारणा करण्यासाठी देशातील फौजदारी न्याय प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी तीन विधेयक भारत न्याय संहिता प्रस्तुत करण्यात आले. तिन्ही विधेयक स्थायी समितीकडे पाठवण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले.

विरोधकांनी स्वार्थासाठी मणिपूरचा वापर केला

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेप्रमाणे, लोकशाहीमध्ये पवित्र असलेल्या संसदेच्या दोन्ही सभागृहात अधिवेशनाच्या प्रारंभीच घमंडीया विरोधकांनी लोकशाहीला मारक, अडमुठेपणाची भूमिका घेतली. संसदेमध्ये कोणतीही चर्चा होऊ नये यासाठी सातत्याने गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेमध्ये मणिपूर विषयावर चर्चा करण्यास सत्ताधारी पक्ष तयार असल्याचे सांगत तसे, लेखी पत्र सुद्धा दिले. राज्यसभेत पक्ष नेते पियुष गोयल यांनी सुद्धा चर्चेसाठी पुढाकार घेतला. परंतु विरोधकांनी नियमाचा वाद उकरून काढत चर्चा होऊ दिली नाही. रोज गोंधळ घालून सभागृह बंद पाडणारे, बहिर्गमन करणारे दिल्लीच्या विधेयकावेळी मात्र चर्चेसाठी सभागृहात सहभागी झाले. त्यावेळी त्यांनी मणिपूरचा मुद्दा स्वतःच्या स्वार्थासाठी बाजूला ठेवला. लोकसभेसोबत राज्यसभेतही विरोधकांना दिल्लीच्या विधेयकावर हार मानवी लागली. विधेयकाच्या बाजूने 131 मते प्राप्त झाली. बीजू जनता दल, वायएसआर काँग्रेस सारख्या पक्षांनी विरोधी पक्षापासून फारकत घेतल्याचे अनिल बोंडे यांनी स्पष्ट केले.

अविश्वास प्रस्तावाचे प्रधानमंत्र्यांनी संधीत रुपांतर केले
विरोधी पक्षाने लोकसभेत अविश्वास प्रस्ताव मांडून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये, 2022 ला विरोधक पुन्हा अविश्वास आणतील अशी भविष्यवाणी केली होती. ती विरोधकांनी खरी ठरविली. अविश्वास प्रस्तावावर काँग्रेस, आम आदमी पार्टी, तृणमृल काँग्रेस या पक्षाची तयारी नसल्याने संपूर्ण देशभरात विरोधकांनी स्वताःचे हसे करून घ्यावे लागले. मात्र सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने अविश्वास प्रस्तावाचे सोने करून नववर्षात देशात केलेल्या विकासाच्या व सकारात्मक बाबींचा आढावा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडला. अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना गृहमंत्री मा.अमित शहा यांनी कणखरपणे देशांमध्ये अशांतता निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नसल्याची रोखठोक भूमिका घेतली. मणिपूरमध्ये हिंसाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असे अभिवचन देऊन देशाचा विश्वास जिंकला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विरोधीक अजूनही घराणेशाही, भ्रष्टाचार तुष्टीकरणाच्या जोखाड्यात अडकलेला आहे. I.N.D.I.A. मधील दोन आय हे अहंकाराचे द्योतक असून सामान्य नागरिक प्रधानमंत्री झालेला काँग्रेसला सहन होत नाही. कोरोना संकट असतानाही भारत आर्थिक दृष्ट्या मजबूत झाला आहे. मोदीजींच्या तिसऱ्या टर्ममध्ये जगात भारत हा तिसरी आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येईल याची हमी मोदीजींनी दिली. प्रधानमंत्री यांच्या दोन तासाच्या माऱ्यापुढे विरोधकांनी गलितगात्र होऊन सभागृहातून पळ काढला. विरोधी पक्षाला प्राप्त असलेला ‘राईट टू रिप्लाय’ ची संधी सुद्धा गमवावी लागली. अविश्वास प्रस्तावाला समोर जाण्याची हिंमत त्यांनी दाखवली नाही. युद्धापूर्वीच काँग्रेसने पराभव मान्य केल्याचेही खा.अनिल बोंडे यावेळी म्हणाले.

मणिपूरमध्ये शांतता नांदेल

मणिपूरमध्ये झालेली हिंसा अतिशय गंभीर आहे. गत अनेक वर्षांपासून मणिपूर, नॉर्थ ईस्टमध्ये असलेली अशांतता नऊ वर्षात विशेष प्रयत्नाने व विकासाने संपवण्यात सरकारला यश आले आहे. परंतु, ब्रह्मदेशामधून आलेले निर्वासित, न्यायालयाचा निर्णय या अनेक बाबींमुळे पेटलेला हिंसाचार हा दुर्दैवी आहे असे सांगून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत देशातील जनतेला आश्वस्त केले की, मणिपूरच्या हिंसाचाराला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. लवकरच मणिपूरमध्ये शांततेचा सूर्य उगवेल यासाठी शासन कटीबद्ध असल्याचेही मोदीजींनी ग्वाही दिल्याचे अनिल बोंडे यांनी सांगितले.

संसदेच्या कामावर एक दृष्टिक्षेप

संसदेत 20 नवे कायदे दोन्ही सभागृहात प्रस्तुत करण्यात आले. दोन्ही सभागृहात 21 विधायक पारित करण्यात आले. ज्यामध्ये प्रलंबित कायदे व नवीन कायद्यांचा समावेश आहे. मानसून सत्र 2022 सोबत याची तुलना केल्यास सहा नवीन कायदे प्रस्तुत करण्यात आले. पाच संसदेच्या दोन्ही सभागृहात पारित करण्यात आले. यामध्ये पूर्वी प्रलंबित असलेल्या कायद्यांचा सुद्धा समावेश आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदा 25 जुलै 2023 रोजी राज्यसभेची अध्यक्षता उत्तर पूर्व राज्यातील नागालँड येथील भाजपच्या खासदार श्रीमती एस. फांगनोन कोन्याक यांनी केली. तर विरोधकांच्या अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व घटनांच्या संदर्भात सभागृहात सर्वाधिक म्हणजे दोन तासांपेक्षा जास्त वेळ विचार व्यक्त केले. तर गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली संशोधन विधेयक 2023 ला उत्तर देताना विरोधकांनी केलेल्या खोट्या आरोपाचे जोरदार खंडन केले. मणिपूरच्या मुद्द्यावर भाष्य करताना त्यांनी विरोधकांनी खोटे षडयंत्र रचून देशात कशा पद्धतीने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला जात आहे या संदर्भातही बोलताना विरोधकांना सडेतोड उत्तर दिल्याचे खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी नमूद केले.

देशहिताची महत्वपूर्ण सहा विधेयक पारित

अधिवेशनामध्ये दिशहिताची सहा महत्वपूर्ण विधेयक पारित करण्यात आले. ‘राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली सरकार संशोधन विधेयक 2023, डिजीटल व्यक्तिगत डाटा संरक्षण (डीपीडीपी) विधेयक 2023, मध्यस्थता विधेयक 2023, अनुसंधान राष्ट्रीय अनुसंधान फाउंडेशन विधेयक 2023, राष्ट्रीय नर्सिंग और मिडवाईफरी आयोग विधेयक 2023 इत्यादींचा त्यामध्ये समावेश आहे.’ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील सर्व घटकांचा सर्वोच्च अन् सर्वोत्तम विकासाला प्राधान्य देत या अधिवेशनकाळातील कामकाजावर भर दिल्याचेही डॉ.अनिल बोंडे यांनी सांगितले.

Post Views: 130
Previous Post

सोलापुरातील तब्बल ९२ जणांना ९४ लाखांचा गंडा….

Next Post

चंद्रपूर: वाईल्ड कनेक्टिव्हिटीच्या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
चंद्रपूर: वाईल्ड कनेक्टिव्हिटीच्या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

चंद्रपूर: वाईल्ड कनेक्टिव्हिटीच्या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

मार्कंडेय महामुनींच्या रथोत्सवानिमित्त ‘गर्भसंस्कार’, सरकारी योजनांची देणार माहिती

मार्कंडेय महामुनींच्या रथोत्सवानिमित्त ‘गर्भसंस्कार’, सरकारी योजनांची देणार माहिती

August 19, 2026
महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०-२०-३० कालबद्ध पदोन्नती योजना लागू करा

महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना १०-२०-३० कालबद्ध पदोन्नती योजना लागू करा

August 19, 2026
संभाजी आरमार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा

संभाजी आरमार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा

August 19, 2026
मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा; लेबर फेडरेशनची मागणी

मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा; लेबर फेडरेशनची मागणी

August 19, 2026

एमपीएससीच्या भरतीत स्पर्धेचा उच्चांक; ५,७०७ जागांसाठी तब्बल १२.६३ लाख अर्ज

August 19, 2026
युवा शक्ती व्यसनमुक्त भारतासाठी : MIT कनिष्ठ महाविद्यालयातील ३० विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

युवा शक्ती व्यसनमुक्त भारतासाठी : MIT कनिष्ठ महाविद्यालयातील ३० विद्यार्थ्यांनी घेतली शपथ

August 19, 2026
अरिहंत इंग्लिश स्कूलमध्ये 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

अरिहंत इंग्लिश स्कूलमध्ये 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

August 19, 2026
डॉ श्रेया कुलकर्णी  ऑथोपिडीक फिजीओथेरपी या परिक्षेत प्रथम वर्गात उत्तीर्ण

डॉ श्रेया कुलकर्णी ऑथोपिडीक फिजीओथेरपी या परिक्षेत प्रथम वर्गात उत्तीर्ण

August 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1088305

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!