आपण लग्न किंवा इतर शुभ कार्यामध्ये भेटवस्तू म्हणून फुलांचे बुके देत असतो. परंतु त्या बुके मधील फुले सुकून गेली की तो टाकून द्यावा लागतो. शेकडो रुपये देऊन घेतलेले बुके अवघ्या तासाभरात कचरा कुंडीत जातात. त्यामुळे याला पर्याय म्हणून सोलापुरातील व्यावसायिक ज्ञानेश्वर म्याकल यांनी नॅपकिन बुके बाजारात आणला आहे. त्यांनी नॅपकिन बुके याच व्यवसायातून सात ते आठ घरगुती काम करणाऱ्या महिला कामगारांना रोजगार दिला आहे.
पुठ्ठा किंवा शीट कार्ड याचा वापर करून विशिष्ट आकारात तो कट केला जातो. त्यानंतर चमकीचे पेपर आणि चिकटपट्टी तसेच स्टेपलरचा वापर करून विशिष्ट आकार देण्यात येतो. आणि त्यामध्ये आकारानुसार नॅपकिनची फुलांच्या आकारात विशिष्ट रचना केली जाते. त्यावर सजावटीच्या टिकल्या, सजावटीचे रिबीन, चमकीच्या टिकल्या आणि आर्टिफिशियल फुले ठेवून प्लास्टिक रॅपर व्यवस्थित गुंडाळले जाते. या प्रकारे नॅपकिन बुके हा तयार होतो. हा नॅपकिन बुके लग्न किंवा इतर शुभ कार्यामध्ये भेटवस्तू आपण देवू शकतो.
माऊली नॅपकिन बुके यांच्याकडे 30 विविध प्रकारच्या आकाराचे बुके आहेत. आकारानुसार आणि त्यात असणारे टॉवेल आणि नॅपकिन यांच्या संख्येनुसार या बुकेंची किंमत 30 रुपयापासून 899 रुपयापर्यंत आहे.
लॉकडाऊनच्या काळात अनेक जणांचे व्यवसाय बंद पडत असल्याने काहीतरी नवा व्यवसाय सुरू करावा या उद्देशाने आमच्या कुटुंबातील सर्वांनी नॅपकिन बुके बनविण्याचा व्यवसाय चालू केला. सुरुवातीला काही मित्रांना हा बुके पाठवून देण्यात आला. ते बुके मित्रांना फार आवडले आणि शहरात प्रत्येक ठिकाणी आम्ही विविध आकारात आकर्षक पद्धतीने बनविण्यास सुरुवात केली, असं माऊली नॅपकिन बुके मालक ज्ञानेश्वर म्याकल यांनी सांगितले.
A very Innovative Product. It serves as a twin Purpose. Very nice.