Saturday, May 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दारु विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी अन् गावकरी एकवटले

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
December 2, 2022
in marathwada
0
दारु विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थी अन् गावकरी एकवटले
0
SHARES
18
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

बंद करा … बंद करा ..दारू विक्री बंद करा… अशा घोषणा देत लातूरच्या उदगीर तालुक्यातल्या दावणगाव येथील विद्यार्थ्यांनी गावात ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला. या मोर्चाला गावातील महिलांसह नागरिकांनी साथ दिली.  दावणगाव उदगीर तालुक्यातील एक मोठं गाव आहे. या गावात मागील अनेक वर्षापासून अवैध दारू विक्री करणारे कार्यरत आहेत. या सहज उपलब्ध होणाऱ्या दारूमुळे गावातील तरुण व्यसनाच्या आहारी गेले आहेत. दारुच्या व्यसनाने अनेकांचे संसार मोडले आहेत तर यामुळं आरोग्याचे प्रश्न देखील निर्माण झाले आहेत.

याबाबत वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली आहे. उदगीर ग्रामीण पोलिसात देखील याबाबत माहिती दिली होती, मात्र अवैध दारू विक्रीला लगाम बसू शकला नाही.  यामुळे संतप्त होत गावातील दोन शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, पालक यांनी एकत्र येत गावातून जनजागरण रॅली काढली. यात मोठ्या संख्येने गावातील महिलांनी घराबाहेर पडत उपस्थिती नोंदवली होती.

दारू विक्री बंद नाही झाली आणि यातील दोषी लोकांवर कारवाई नाही झाली तर पुढील आंदोलन यापेक्षा तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी विद्यार्थी आणि नागरिकांनी दिला आहे. दावणगाव येथील बहुतांश गावकरी शेती व्यवसाय करतात. गावातील अनेक कुटुंबं मोलमजुरी करुन गुजराण करतात. यात काही मंडळी मात्र व्यसनाच्या आहारी गेली आहे. हाताला चार पैसे आले की कुटुंबातील व्यक्ती दारूचा अड्डा जवळ करतो.  नित्यनियमाने दारू पिणे आणि गावात गोंधळ घालणं असा अनेकांचा दिनक्रम झाला आहे. यामुळे गावात सामाजिक शांतता बिघडली आहे.  याचा थेट परिणाम कुटुंबांवर होत असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर देखील याचा परिणाम होत आहे. दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबाची अर्थव्यवस्था पार मोडकळीस आली आहे.

दावणगावामध्ये अवैध दारू विक्री करणाऱ्या व्यक्तीस अनेक वेळा दारू विक्री करू नको असं सांगण्यात आलं होतं.  याची माहिती पोलिसांनाही देण्यात आली होती. मात्र याचा काहीही परिणाम होताना दिसत नाही. गावात उघडपणे दारू विक्री सुरूच आहे. यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आपला आवाज उठवण्यासाठी आज मोर्चाचं आयोजन केलं.

Post Views: 86
Previous Post

फुलांच्या बुकेला पर्याय म्हणून सोलापुरातील व्यावसायिकाने नॅपकिन बुके…

Next Post

संभाजीनगर GST विभागान केला 500 कोटींचा घोटाळा उघड..

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
संभाजीनगर GST विभागान केला  500 कोटींचा घोटाळा उघड..

संभाजीनगर GST विभागान केला 500 कोटींचा घोटाळा उघड..

ताज्या बातम्या

आरोपीला घेऊन जाणाऱ्या पोलीस व्हॅनचा अपघात #solapurnews #marathinews #viral

May 30, 2026

रेल्वेच्या वेळापत्रकात होणार बदल #solapurnews #news

May 30, 2026

नालेसफाई महागात नगरअभियंताची वेतनवाढ रोखली झोन अधिकारी निलंबित #solapurnews #viral

May 30, 2026

जरांगे पाटलांच्या उपोषणावर बोलले मुख्यमंत्री #marathinews #news

May 30, 2026

परत हुतात्मा एक्सप्रेस सहा तास पुण्यातच स्टेशनवर रखडली प्रवाशांची गैरसोय #solapurnews #news

May 30, 2026

*सावधान विचलित करणारे दृष्य *जुन्या वादातून सहा जणांचा खून

May 30, 2026

पुण्यात जनगणना करताना शिपाई महिलेला बेदम मारहाण #viral #news #marathinews

May 30, 2026
“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

“मित्रपक्षांना डावलू नका”; मंत्री उदय सामंतांचा सूचक इशारा

May 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0886869

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697