पोलीस उपनिरीक्षक पदासाठी विभागीय भरती परीक्षा घेण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने केली आहे. या भरतीअंतर्गत पीएसआय पदाच्या ६१५ जागा भरण्यात येणार आहे. यासाठीची अर्ज प्रक्रिया लवकरच सुरु होणार असून ३ ऑक्टोबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीचे सर्व तपशील जाणून घेऊया..
स्पर्धा परीक्षेतून पीएसआय होण्याचे स्वप्न पाहत असाल, परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग’ अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक (विभागीय) पदांसाठी भारती प्रक्रिया राबावली जात आहे. या द्वारे राज्यामध्ये ६१५ पदांची भरती केली जाणार आहे. तर लवकरच परीक्षाही होणार आहे. या भरतीसाठी इच्छूक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत.
या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ११ सप्टेंबर पासून सुरु होणार आहे, तर ३ ऑक्टोबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. या भरतीसाठीची पूर्वपरीक्षा डिसेंबर २०२३ मध्ये होणार आहे. विशेष म्हणजे ही भरती विभागीय असून पोलीस खात्यातील कर्मचारी या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठीची पात्रता, वयोमर्यादा, अर्ज कसा करावा आणि भरतीसाठीचे सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे…
महाराष्ट्र लोकसेवा आयोग पोलीस उपनिरीक्षक भरती प्रक्रिया २०२३
पदाचे नाव: पोलिस उपनिरीक्षक
पद संख्या: ६१५ जागा
शैक्षणिक पात्रता: या भरतीसाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीतील सध्या कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार, पोलीस नाईक आणि पोलीस शिपाई या संवर्गातील कर्मचारी पात्र असतील.
मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेचा पदवीधर असलेल्या उमेदवारांची ४ वर्षे नियमित सेवा असायला हवी.
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची एच.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र शासनाने एच.एस.सी. च्या समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता, अशा उमेदवारांची ५ वर्षे नियमित सेवा असायला हवी.
महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण किंवा महाराष्ट्र शासनाने एस.एस.सी.च्या समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता, अशा उमेदवारांची ६ वर्षे नियमित सेवा असायला हवी.
नोकरी ठिकाण: महाराष्ट्र
अर्ज शुल्क:
अमागास – ८४४ रुपये.
मागासवर्गीय – ५४४ रुपये.
वयोमर्यादा:
खुल्या प्रवर्गासाठी – कमाल वयोमर्यादा ३५ वर्षे
मागासवर्गीय/ अनाथ – कमाल वयोमर्यादा ४० वर्षे
अर्ज पद्धती: ऑनलाईन
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख: ११ सप्टेंबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३ ऑक्टोबर २०२३
अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
वेतनश्रेणी: ३८ हजार ते १ लाख २२ हजार ८००
निवड प्रक्रिया:
पूर्व परीक्षा – १०० गुण
मुख्य परीक्षा – ३०० गुण
शारीरिक चाचणी – १०० गुण