श्री तुळजाभवानी देवीची शाकंभरी नवरात्रोत्सव दि.२३ डिसेंबर ते दि. ७ जानेवारी या कालावधीत साजरा होत आहे. तत्पूर्वी दि.२३ डिसेंबर रोजी सायंकाळी पंचामृत अभिषेक संपल्यानंतर तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ होईल.
देवीची मंचकी निद्रा संपल्यानंतर ३० डिसेंबर रोजी पहाटे देवीची सिंहासनावर पूर्ववत प्रतिष्ठापना होणार असून, त्यानंतर विशेष पंचामृत अभिषेक पूजा होऊन सकाळी ६ वाजता नित्योपचार अभिषेक पूजा होईल. दुपारी १२ वाजता गणेश विहारात शाकंभरी नवरात्रच्या मुख्य यजमान दाम्पत्याच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. त्यानंतर रात्री पंचामृत अभिषेक व छबिना मिरवणूक काढली जाणार आहे. ३ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ७ वाजता शाकंभरी नवरात्रातील मुख्य आकर्षण असलेली हजारो सुवासिनी महिलांची जलयात्रा निघेल. ४ जानेवारी रोजी सकाळी नित्योपचार पूजा व रात्री छबिना, ५
शाकंभरी यजमानपद उपाध्ये मंडळाकडे
शाकंभरी महोत्सव २०२२- २३ चे यजमानपद यावर्षी उपाध्ये मंडळाकडे आले आहे. यजमानपदासाठी मंडळाकडून उपाध्ये राम प्रभाकर कुलकर्णी व सुधीर जेवळीकर यांनी यजमानपद भूषविण्याची तयारी दर्शवली होती. यासाठी उपाध्ये मंडळाने दोघांच्या नावांची चिठ्ठी टाकली. यात राम कुलकर्णी यांचे नाव आल्याने त्यांना शाकंभरी यजमानपद आल्याचे मंडळाचे अध्यक्ष कोंडो यांनी सांगितले.
राम कुलकर्णी उपाध्ये
रोजी अग्निस्थापना होऊन यज्ञास प्रारंभ होणार आहे. ६ जानेवारी रोजी पौर्णिमा असून, या दिवशी धूपारती, घटोत्थापन, पूर्णाहुती व रात्री छबिना असे कार्यक्रम होणार आहेत. ७ जानेवारी रोजी अन्नदान महाप्रसाद रात्री छबिना मिरवणूक झाल्यानंतर या नवरात्रोत्सवाची सांगता होणार आहे.
कापूस पिंजारी यांचा मान ११ पिडी पासुन चालु आहे. गादी पिंजारी म्हणुन शम्मु बाशिमिया नदाफ तसेच शिंपी यांची ही सातवी पिडी सध्या जनार्धन गणपतराव निकते त्यांचे नातु मंगेश निकते यांच्याकडु चालु आहे.
पलंग तयार करण्याचा माण तुळजापूरचे पलंगे घराण्याकडे आहे पलंगेकुंटूब वर्षानु वर्षे हि परंपरा जपत आले आहेत .