सर्व शारीरिक पिडा या मानसिक काळजीमुळे होतात. सर्व मानसिक काळजी बौद्धिक अपरिपक्वपणामुळे निर्माण होतात. बौद्धिक परिपक्वता ही आध्यात्मिक ऊर्जा व आध्यात्मिक विवेकज्ञान कमी असल्याने येते. ध्यान करून साधकांना भरपूर आध्यात्मिक ऊर्जा व आध्यात्मिक विवेकज्ञान मिळते.श्री रामचंद्र मिशन संचलित कान्हा शांतीवनम, हैदराबाद येथे सहज मार्गाचे जागतिक ध्यान केंद्र आहे गुरुदेव श्री. कमलेशजी पटेल हे या संस्थेचे प्रमुख आहेत. सहजमार्ग ही आध्यात्मिक संस्था ह्रदयावर ध्यान प्रक्रिया शिकवते. ईश्वरास हृयात शोधण्यास मदत करते.जगभरात जवळपास १६५ देशामध्ये कार्यरत आहे. १९४५ पासून आजपर्यंत विनामूल्य सेवा देत आहे. देशात असंख्य लोक (अभ्यासी) आहेत. अनेक ठिकाणी आश्रम व प्रशिक्षक आहेत. सोलापूरला अक्कलकोट रोडवरील इस्कॉन मंदिरजवळ हा आश्रम आहे.प्रत्येक रविवारी सकाळी ७ वा. ध्यान करता येते. ध्यानामुळे हृदय शांत होते. विचार स्थिर व शांत होऊन एकाग्रता वाढते. रक्तदाब व मधुमेह नैसर्गिक राहतो. ताणतणाव, चिडचिडेपणा कमी होतो. मन आनंदी राहते.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...