हिंगोली – 1999-2000 मध्ये इयत्ता 10 वी चे उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. 25 वर्षांनी सर्व माजी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा देणारा भावनिक क्षण साजरा केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष: विठ्ठलराव लुटे सर
प्रमुख पाहुणे: परळीकर सर, थोरात सर, गुंटूरकर सर,जाधव सर,चंद्रवंशी सर, दत्तराव ठोंबरे (मामा), सेवक उमराव ठोंबरे
मार्गदर्शन करणारे शिक्षक:
मुंडिक सर, भिसे सर, वारे सर, भक्कड सर, बीच्चेवार सर, कुतुब सर — यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थी प्रतिनिधींचे मनोगत:
कल्पना जोगदंड, अनिल कांबळे, संदीप परळीकर, आशा राऊत, ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी शालेय जीवन, शिक्षकांचे मार्गदर्शन व मैत्रीच्या आठवणी शेअर करत सर्वांना भावविवश केले.
सूत्रसंचालन: कल्पना जोगदंड व संदीप परळीकर
आभार प्रदर्शन: गीतेश स्वामी
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतलेले माजी विद्यार्थी:
ज्ञानेश्वर ठोंबरे, ज्ञानेश्वर बोंगाणे, संदीप परळीकर, लक्ष्मण भगत, गजानन रावले, कंठेश्वर रावले, राठोड, माऊली कुरे, जावेद शेख, मीरा चव्हाण, अशा राऊत, अनिल कांबळे, कल्पना जोगदंड आणि सर्वच स्नेही मित्रमंडळी.






















