गेल्या दीड महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने आज सोलापूर जिल्ह्यात पुनरागमन केले आहे. कुठे रिमझिम, कुठे मध्यम तर कुठे मुसळधार बरसलेल्या पावसामुळे बळिराजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. या पावसामुळे खरिपाच्या तग धरून राहिलेल्या पिकांना जीवदान मिळणार असून, आता शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागण्याची शक्यता आहे.
शहर व परिसरामध्ये रमध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरवात झाली होती. मागील दोन दिवसांपासून परिसरामध्ये ढगाळ वातावरण होते. मात्र, पाऊस पडला नव्हता. वातावरणातील उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. आज पडलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. तब्बल दीड महिना पावसाने दडी मारल्यामुळे ग्रामीण भागामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, आज सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.