तुळजापूर येथील श्री. तुळजाभवानीचा गायब झालेला सोन्याचा मुकूट सापडला असल्याचा दावा सोने मोजनी समिती सदस्य आणि पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी केलाय. तुळजाभवानी मंदिरातील पितळी पेटीत हा मुकूट सापल्याची माहीती मिळली आहे. ८२६ ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकूट गायब झाला असल्याचे मोजनी समितीच्या अहवालात सांगण्यात आले होते.
२००९ ते २०२३ या कालावधीमध्ये तुळजाभवानीला भाविकांनी दान केले. यात सोने, चांदी आणि मौल्यवान वस्तूची मोजदात मंदिर संस्थानकडून करण्यात आली होती. त्यापैकी ८२६ ग्रॅम वजनाचा सोन्याचा मुकूट सापडल्याचा दावा कदम यांच्याकडून करण्यात आला आहे. मात्र, तोच मुकूट अता सापडल्याचा दावा कदम यांच्याकडून करण्यात आलाय.