शाहरुख खान डंकी सिनेमा प्रदर्शित होण्याआधी वैष्णो देवीच्या चरणी पोहोचला. तो यावर्षात तिसऱ्यांदा देवीच्या दर्शनासाठी गेला. पठाण आणि जवान सिनेमाआधीही तो देवी चरणी पोहोचला होता.
बॉलिवूड किंग खान शाहरुख वैष्णो देवीच्या दर्शनासाठी पोहोचला आहे. २०२३ मध्ये तो तिसऱ्यांदा देवीच्या दर्शनासाठी पोहोचला आहे. किंग खानचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये शाहरुख खान वैष्णो देवी मंदिरात पोहोचण्यासाठी चालताना दिसतो आहे. २०२३ हे वर्ष शाहरुखसाठी खास ठरलं. या वर्षातील त्याचे पठाण आणि जवान हे दोन्ही सिनेमे ब्लॉकबस्टर ठरले. पठाण आणि जवान हे दोन्ही सिनेमे प्रदर्शित होण्याआधी शाहरुख वैष्णो देवी मंदिरात पोहोचला होता.
आता शाहरुखचा आगामी डंकी सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. सिनेमा प्रदर्शित होण्याआधी तो पुन्हा एकदा माता वैष्णो देवीच्या मंदिरात पोहोचला. त्याने देवीचं दर्शन घेत आशीर्वाद घेतले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये शाहरुख खानसोबत वैष्णो देवी मंदिरात त्याची मॅनेजर पूजा ददलानी देखील दिसते आहे.
कडेकोट सुरक्षेत शाहरुखची वैष्णोदेवी यात्रा
शाहरुख खान कडेकोड सुरक्षेदरम्यान आणि आपल्या सिक्युरिटी गार्डसोबत वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाताना दिसला. यावेळी शाहरुखने त्याचा चेहरा जॅकेटने लपवला होता, जेणेकरुन लोक त्याना ओळखू नयेत.