पंढरपूर येथील एका तरुणाकडून गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिस पथकाने एक गावठी बनावटीचे पिस्तूल, गावठी बनावटीचा राऊंड व वाघनख्या जप्त केल्या आहेत. अटक केलेल्या तरुणाचे नाव अभिजित रामा भोरे (वय २६, रा. पवार नगर, इसबावी, पंढरपूर) असे आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस पंढरपूर शहरात गस्त घालत असताना पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेत होते. यावेळी इसबावी येथील एका हॉटेलच्या पाठीमागे एकजण त्याच्या कमरेस पिस्तूलसारखे हत्यार लावून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तत्काळ पोलिसांनी ती माहिती पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना फोनद्वारे कळविली. त्यांच्या आदेशाने संबंधित ठिकाणाजवळ पोलिस गेले. तेथे एक इसम संशयितरित्या हॉटेलमागे सिमेंट रोडलगत येत असताना दिसला. त्याचा संशय आल्याने त्यास लागलीच गराडा घालून जागीच पकडले.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...