Wednesday, July 29, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

‘ऑपरेशन सिंदूर’ने पाकिस्तानला सावधगिरीचा चांगला धडा दिला आहे; आता भारतावर कोणतीही आगळीक करण्यापूर्वी दोनदा विचार करेल: संरक्षण मंत्री

तरुण भारतbyतरुण भारत
October 24, 2025
in india
0
0
SHARES
11
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


नवी दिल्ली – “आपल्या सशस्त्र दलांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान पाकिस्तानला सावधगिरीचा चांगला धडा दिला आहे, त्यामुळे आता भारताशी कोणतीही आगळीक करण्यापूर्वी पाकिस्तान दोनदा विचार करेल,” असे  संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 23 ऑक्टोबर 2025 रोजी राजस्थानमधील जैसलमेर येथे जवानांसोबतच्या ‘बडाखाना’ कार्यक्रमात संवाद साधताना सांगितले.

‘ऑपरेशन सिंदूर’ संपलेले नाही, केवळ थांबवण्यात आले आहे, याचा पुनरुच्चार करताना संरक्षण मंत्र्यांनी पाकिस्तानला सक्त ताकीद दिली की, जर त्याने कोणतीही आगळीक केली तर  यापेक्षाही कठोर प्रत्युत्तर दिले जाईल. “आपल्या वैमानिकांनी पाकिस्तानला भारताच्या सामर्थ्याचे केवळ एक प्रात्यक्षिक  दाखवले आहे. जर संधी मिळाली, तर ते आपली खरी ताकद जगाला दाखवतील,” असे ते म्हणाले.

देशाचे शत्रू कधीही निष्क्रिय नसतात, याकडे लक्ष वेधून राजनाथ सिंह यांनी सशस्त्र दलांना नेहमी सतर्क आणि तयार राहण्याचे, तसेच त्यांच्या हालचालींविरुद्ध योग्य आणि प्रभावी पावले उचलण्याचे आवाहन केले.

संरक्षण मंत्र्यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित आणि आत्मनिर्भर राष्ट्र बनवण्याच्या पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या दृष्टिकोनाला मूर्त रूप देण्यात सशस्त्र दले कोणती भूमिका बजावू शकतात यावर प्रकाश टाकला.

आपले जवान केवळ सीमांचे रक्षक नाहीत, तर ते राष्ट्र उभारणीचे प्रणेते आहेत. हे शतक आपले आहे; भविष्य आपले आहे आणि आपण आत्मनिर्भरतेच्या दिशेने जी प्रगती केली आहे, त्यामुळे  आपले सैन्य निःसंशयपणे जगातील सर्वोत्तम सैन्य बनेल असा मला विश्वास वाटतो, असे त्यांनी सांगितले.सीमेवरील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी पुन्हा एकदा दिली. याच अनुषंगाने संरक्षण सज्जता आणखी वाढवण्यासाठी सरकारने सीमाभागात विकासकामे हाती घेतली असल्याचे त्यांनी सांगितले.

भारताची संस्कृती, सभ्यता आणि मूल्ये यांचे प्रतीक म्हणून बडाखाना परंपरेचे महत्वही त्यांनी अधोरेखित केले. बडा खान्यात प्रत्येकाला समान वागणूक दिली जाते.  आपले सैन्यदल म्हणजे विविध धर्म, जाती, भाषा आणि प्रदेशांतील लोकांचे घरच आहे. सैन्य दलात प्रचंड विविधता आहे, बडा खान्यातील एकाच ताटाच्या रुपातही त्याचेच प्रतिबिंब उमटते, आणि म्हणूनच इतर कोणत्याही भोजन समारंभापेक्षा बडा खाना ही श्रेष्ठ परंपरा असल्याचे त्यांनी नमूद केले.

बडा खान्यात सहभागी होण्यापूर्वी, संरक्षणमंत्र्यांनी जैसलमेर इथे शौर्यवन या एका अद्भूत कॅक्टससह इतर वनस्पती असलेल्या उद्यानाचे (Cacti-cum-Botanical Garden) उद्घाटन केले. शौर्यवन हे उद्यान भारतीय लष्कराचा उपक्रम आहे. या उद्यानाच्या माध्यमातून थरच्या वाळवंटाला एका प्रफुल्लीत ओअॅसिसचे स्वरुप मिळवून देण्याचा प्रयत्न असून, हे उद्यान लवचिकता, पर्यावरण संवर्धन आणि नवोन्मेषाचे प्रतीक आहे.

आपल्या या भेटीत राजनाथ सिंह यांनी भारत रणभूमी दर्शन उपक्रमांतर्गत,  जैसलमेर इथल्या शौर्य गंतव्य या युद्ध स्मारकाला भेट देऊन आदरांजलीही अर्पण केली. या स्मारकातील संघर्ष काळातील भारतीय लष्कराच्या शौर्याच्या चिरस्थायी इतिहासाची प्रतीके म्हणून, जतन केलेल्या युद्धासंबंधीचे चषक आणि कलाकृतींच्या विस्तृत संग्रहाबद्दलची माहितीही त्यांनी घेतली. या स्मारकातील होलोग्राफिक लाईट आणि साऊंड शो चे उद्घाटनीय सादरीकरणही त्यांनी पाहिले.  हे एक अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सादरीकरण असून, यामुळे हे स्मारकस्थळाला आवर्जून भेट द्यावे असे महत्वाचे ठिकाण झाले आहे.

यावेळी लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह, उप लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंह, लष्कराचे सर्व  कमांडर आणि भारतीय लष्कराचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

उद्या 24 ऑक्टोबर 2025 रोजी संरक्षणमंत्री इतर क्षेत्रांना भेट देणार आहेत, तसेच  दक्षिण कमांडच्या क्षमता प्रदर्शन सरावाची पाहणी ते करणार आहेत. यासोबतच ते जैसलमेर इथे आर्मी कमांडर परिषदेलाही संबोधित करणार आहेत.

Post Views: 53
Previous Post

जेव्हा युवाशक्ती यशस्वी होते, तेव्हा राष्ट्र यशस्वी होते : पंतप्रधान

Next Post

सशस्त्र दलांची क्षमता वाढवण्यासाठी संरक्षण संपादन परिषदेची (DAC) सुमारे 79,000 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सशस्त्र दलांची क्षमता वाढवण्यासाठी संरक्षण संपादन परिषदेची (DAC) सुमारे 79,000 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी

ताज्या बातम्या

३१ जुलै रोजी सोलापूर येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा

July 29, 2026

संत प्रभाकर महाराज मंदिरात भक्तांची गर्दी

July 29, 2026

खत पुरवठा, काळाबाजार आणि लिंकिंगच्या प्रश्नावर केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण भूमिका

July 28, 2026
शाहिरी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शिवराय,जिजाऊ, सावित्रीबाई यांच्यावरील पोवाड्याचे सादरीकरण

शाहिरी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शिवराय,जिजाऊ, सावित्रीबाई यांच्यावरील पोवाड्याचे सादरीकरण

July 28, 2026
महाराष्ट्र अॅड गोवा नोटरीज असोसिएशनच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी अॅड. लक्ष्मण मारडकर

महाराष्ट्र अॅड गोवा नोटरीज असोसिएशनच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी अॅड. लक्ष्मण मारडकर

July 28, 2026

पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीच्या जाहिराती अचानक रद्द; प्राथमिक शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

July 28, 2026
लायन्स क्लब ऑफ सोलापूरचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

लायन्स क्लब ऑफ सोलापूरचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

July 28, 2026
आषाढी वारीत ७.४७ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; मधुमेह, ताप, उच्च रक्तदाबासह विविध आजारांवर प्रभावी उपचार

आषाढी वारीत ७.४७ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा; मधुमेह, ताप, उच्च रक्तदाबासह विविध आजारांवर प्रभावी उपचार

July 28, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1010286

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!