नागरिकांच्या मदतीसाठी असलेल्या डायल ११२ वर फोन करून खुन झाल्याची माहिती दिली. प्रत्यक्ष पोलिसांनी सांगितलेल्या घटनास्थळी जाऊन पहाणी केली असता, असा काही प्रकार घडला नसल्याचे समजले. त्यामुळे पोलिसांनी खोटी माहिती दिली म्हणून संबंधित व्यक्ती विरूद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
अधिक माहिती अशी की, सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात हवालदार गणेश लोखंडे हे डायल ११२ वर ड्युटीला होते. दरम्यान त्यांना एम.डी.टी. चॅनल नंबर १ वर १२.०२ वाजण्याच्या सुमारास एका मोबाईल नंबरवरून अज्ञात व्यक्तीचा फोन आला. फोन वरील व्यक्तीने बोरामणी (ता.दक्षिण सोलापूर) येथे व्हॉलीबॉल मैदानाच्या ठिकाणी १८ वर्षीय मुलीला तिच्या नवऱ्याने अर्ध्या तासापुर्वी मारहाण करून कुऱ्हाडीने खुन केला आहे, अशी माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार, हवालदार गणेश लोखंडे यांनी पुन्हा फोन आलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क केला. मात्र, संबंधित व्यक्तीने उचलला नाही.