लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सांगोला नगर परिषदेच्या वतीने क्यूआर कोडचा अभिनव उपक्रम राबविला आहे. यामुळे मतदारांना घरबसल्या क्यूआर कोड स्कॅन करून मतदान केंद्र शोधता येणार आहे.निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार माढा लोकसभा मतदारसंघाकरिता येत्या ७ मे रोजी मतदान होणार आहे. यादृष्टीने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निवडणूक यंत्रणा पूर्णपणे प्रयत्नशील असून, स्वीप कार्यक्रमांतर्गत सर्व स्तरावर जनजागृती केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून सांगोला नगर परिषदेकडून सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी याकरिता अभिनव उपक्रम राबविला आहे. याअंतर्गत सांगोला विधानसभा क्षेत्रातील मतदारांना घरबसल्या क्यूआर कोड स्कॅन करून मतदान केंद्र शोधणे सोईस्कर झाले आहे. सांगोला विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण २९९ मतदान केंद्र असून, एकूण ३,१२,४८८ मतदार आहेत.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...