वाटुर प्रतिनिधी अयाज पठाण
परतुर वाटुर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांचे सरकार येताच दिव्यांगांना प्रति महिना सहा हजार रुपये पेन्शन लागू केली या धाडसी निर्णयाचे मा मंत्री तथा प्रहार संघटनेचे संस्थापक दिव्यांग कल्याण अध्यक्ष मुंबई आमदार बच्चुभाऊ कडू यांनी आंध्र प्रदेश सरकारचे कौतुक केले
आंध्र प्रदेश मध्ये दिव्यांगांना मोठा दिलासा मिळाला पण महाराष्ट्रात दिव्यांगांना मोठा संघर्ष करावा लागत असून महाराष्ट्र सरकार दिव्यांगांना प्रति महिना दीड हजार रुपये देते ते पण चार चार महिने दिवंग्याच्या खात्यामध्ये जमा होत नसून दिव्यांगांना मोठ्या संकटांना समोर जावे लागत आहे
देशामध्ये महाराष्ट्रात प्रथम दिव्यांग मंत्रालय स्थापन झाले असून एक वर्ष उलटूनही दिव्यांगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन सरकारचा दिसत नाही व दिव्यांगा बाबत ठोस निर्णय घेतले जात नाहीत तरी महाराष्ट्र सरकारने दिव्यांगा बाबत आंध्रप्रदेश सरकारच्या धरतीवर सहा हजार रुपये प्रति महिना पेन्शन लागू करावी =============
असे पत्रकारांशी बोलताना अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना यांनी माहिती दिली