माहूर, दि. २४ जून
“एक धीरगंभीर लढवय्या कार्यकर्त्याला आणि जनसामान्याच्या उच्चशिक्षित नेतृत्वाला विधान परिषदेवर घेऊन त्यांनाच नाही तर त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य जनसामान्यांना व भाजप पदाधिकारी व सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय द्यावा! लोकसभा नाही तर आता विधानपरिषदेच्या माध्यमातून सुमठाणकर यांना नक्कीच न्याय मिळेल यासाठी पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली आहे.! ” अशी माहिती भाजयुमो नांदेड जिल्हा अध्यक्ष संदीप राठोड यांनी दिली असून,किनवट माहूर तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधून ही मागणी सध्या प्रचंड जोर धरू लागली आहे.
राज्यातील लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीला अपेक्षित यश मिळाले नाही.आणि निकालानंतर सर्वत्र जर तर ची चर्चा सुरू झाली.
नांदेड,यवतमाळ-वाशिम व सोबतच हिंगोली मतदारसंघात महायुतीला पोषक वातावरण नसल्याचे राजकीय जाणकार व पक्षांतर्गत सर्वेक्षणात सुद्धा विविध प्रसार माध्यमांनी अंदाज वर्तवले होते. आणि हा अंदाज १००टक्के खराही ठरला.नांदेडमध्ये ततसमयी कॉंग्रेसचे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या भाजपप्रवेशामुळे निकालात काय दिवे लावले
ते सर्वांनी पाहिले.तर हिंगोलीचा (मुळ नांदेड) चा उमेदवार शिवसेनेने पाच वेळेचा यशस्वी खासदार सोडून यवतमाळ लोकसभेवर देण्याचा आततायीपणा केला. तर विरोधी वातावरणामुळे हिंगोलीत रणींग खासदाराचे तिकीट कापले हे खरे परंतु,ऐनवेळी त्यांच्याच मर्जीतल्या नवखा उमेदवार थोपवून पाच वर्षांपासून एक एक मतदारापर्यंत पोहचून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जनकल्याणकारी कार्य घराघरांत पोहचवण्यात दिवसरात्र घाम गाळून मतदारांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या व यंदा महायुतीकडून हिंगोली लोकसभेची तिकीट आपणासच मिळेल याची पूर्णत: खात्री असलेल्या रामदास पाटील सुमठाणकर यांची सर्व मेहनत अक्षरश: पाण्यात गेली असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
कारण त्यांना तिकीट न देता युतीधर्म पाळत ऐनवेळी हिंगोली लोकसभेवर अक्षरश: नवख्या बाबुराव कदम यांना उमेदवारी देण्यात आली.आणि निकाल,लागायचा तोच लागला “बाबुराव गेला आणि नागोराव आला”.आता महायुतीकडून झालेली चुक जर वेळीच दुरुस्त करायची असेल तर आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सच्चा कार्यकर्त्याला न्याय म्हणून रामदास पाटील सुमठाणकर यांना विधानपरिषदेवर वर्णी लावावी अशी मागणी हिंगोली,नांदेड या दोन्ही जिल्ह्यातील महायुतीच्या भाजपा पदाधिकारी व सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधून जोर धरू लागली आहे.
हिंगोली,नांदेड, लातूर या तीनही जिल्ह्यात भाजपचे हिंगोली लोकसभा प्रभारी रामदास पाटील सुमठाणकर यांची चांगली पकड आहे.
हिंगोली लोकसभेसाठी भाजपकडून पहिली पसंती असलेले रामदास पाटील सुमठाणकर यांनी पक्ष आदेशाचा मान ठेवत महायुतीचे शिंदे गटाचे उमदेवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्यासाठी मतदारसंघात झंझावती दौरा केल्यामुळेच बाबुराव हे नवखे असूनही त्यांनी नागेश पाटील आष्टीकरांना चांगलीच टक्कर दिली.
लोकसभेची उमेदवारी रामदास
पाटील यांना महायुतीच्या जागावाटपामुळे मिळाली नाही
परंतु राज्यात आता विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी निवडणुका
असून,त्यामध्ये भाजपचे रामदास पाटील सुमठाणकर
यांच्यासारख्या स्वच्छ प्रतिमेच्या आणि ओबीसींचा
नांदेड,लातूरव हिंगोली या तीनही जिल्ह्यात मोठा चेहरा असलेल्या उमेदवाराची
विधानपरिषदेवर वर्णी लागावी यासाठी भाजपचे
पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून हिंगोली, नांदेड आणि लातूर जिल्ह्यातून जोरदार मागणी होत आहे.
हिंगोली लोकसभा मतदारसंघात भाजपकडून रामदास पाटील सुमठाणकर यांनी तयारी केली होती. मतदारसंधात भाजपने रामदास पाटील यांना ‘जर’ उमेदवारी दिली असती ‘तर’ आज चित्र कदाचित वेगळे दिसलेअसते.
परंतु, संधी न मिळाल्याने निराशेने खचून न जाता रामदास पाटील यांनी महायुतीचा धर्म पाळीत, समर्थकांना समजावून सांगत मतदारसंघात प्रचार केला. या प्रचारामुळे महायुतीच्या उमेदवाराला चांगले मतदान झाले.हिंगोली नगर परिषदेत मुख्याधिकारी असतांना पदाचा राजीनामा देत रामदास पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून रामदास पाटील यांची ओळख आहे. कमी कालावधीत पक्षाचे संघटन आणि निष्ठेने काम करणारे कार्यकर्ते म्हणून रामदास पाटील सुमठाणकर यांनी पक्षात ओळख निर्माण केली आहे.
हिंगोली, लातूर, मुंबई या ठिकाणी लोकसभा निवडणुकीत अत्यंत चांगली कामगिरी करणारे रामदास पाटील यांना विधान परिषदेवर घेऊन त्यांनी अल्पावधीत केलेल्या कामाची पावती त्यांना मिळावी अशी अपेक्षा भाजप- तील कार्यकर्त्यांकडून आता जोर धरू लागली आहे.हदगाव, उमरखेड,यासह किनवट व माहूर तालुक्यातील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे जोरदारपणे मागणी लावून धरली असल्याचे माहूर येथील भाजयुमोचे नांदेड जिल्हाध्यक्ष संदीप राठोड यांनी सांगितले आहे.