परतूर: प्रतिनिधी
वृक्षारोपण लागवड व संवर्धन, जैविक विविधता जपणे काळाची गरज हे उद्देश समोर ठेवून हरित प्रल्हादपुर, वृक्षारोपण चळवळ समिती, परतूर तर्फे भव्य 251 वृक्षारोपण मेगाड्राइव्ह कार्यक्रम आयोजन दिनांक 24 जून 2024 (लीप वर्षाचा 176 वा दिवस) रोजी बस स्टँड परतूर येथे श्रीनिवास के. वागदरीकर
आगार व्यवस्थापक, रा.प. परतूर आगार व श्री जगदीश्वर बरसाले, स्थानक प्रमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
या विधायक कार्यात संदीप बाहेकर, डॉ. स्वप्नील बी. मंत्री, अभयकुमार काळुंखे, डॉ सुधीर आंबेकर, एस.पी पाटोदकर, सखाराम कुलकर्णी, अजित पोरवाल, बालाजी सांगुळे, अनिल अग्रवाल, विठूमामा कुलकर्णी, दुर्गेश पोतदार, श्रीहरी डोळे, सावता काळे, प्रमोद राठोड, नरेश सोनवणे, आबासाहेब ढवळे, आगार स्टाफ व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
यावेळी बस आगार वरिष्ठ स्टाफ कासम भाई यांचा अविरत सेवेसाठी सत्कार करण्यात आला..