तभा फ्लॅश न्यूज/ वाशी : आतापर्यंत आपण स्वर्गातला यमराज मार्ग लोकांमध्ये बोललं जातं असल्याचं ऐकलं असेल पण आता पृथ्वीवरच यमराज मार्ग तयार झाला आहे. होय खरंच यमराज मार्ग! तो म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागचा धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात हा यमराज मार्ग आहे.
तालुक्यातील कडकनाथवाडी बार्शी रस्ता हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग धाराशिव यांच्याकडे आहे. या रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा ही समजणे नागरिकांना मुश्किलीची झाले आहे. या रस्त्यावरून नागरिकांना जीव घेणे प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत, रस्त्यावर पडलेल्या खड्यात पावसाचं पाणी साचल्यामुळे नागरिकांना तसेच वाहन चालकांना खड्डे दिसत नाहीत. त्यामुळं त्या खड्ड्यामध्ये अपघाताची मालिका सुरू आहे.
मोटारसायकल धारकांना तर रस्त्यावरून जा-या करताना मोठी कसरत करावी लागते. रस्ता थोडाफार चांगला होता. त्यात पवनचक्क्या कंपन्याकडून रस्त्याचे “तीन तेरा, नऊ अठरा” करण्यात येत आहेत. कडकनाथवाडी शिवारात टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी पवनचक्की कंपनीकडून पवनचक्की उभारण्याचे काम चालू आहे. त्या अनुषंगाने साहित्याची वाहनातून वाहतूक सुरू आहे. रस्त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक वजन असलेली पवनचक्कीची वाहनं रस्त्यावरून जात असल्याने रस्ता जागोजागी खचू लागला आहे.
या वाहनांना कोणाचाही धाक नसल्याचं चित्र पाहायला मिळतं. संबंधित विभागाकडून टाटा कंपनीला रस्ता खराब होत असल्याबाबत नोटीस देखील बजावली परंतु बांधकाम विभागाच्या या नोटीसला कंपनीकडून केराची टोपली दाखवली जाते. मात्र यात नागरिकांना रस्त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता खराब असल्यामुळे अपघाताची मालिका सुरू असल्याने परिसरात या रस्त्याला यमराज मार्ग म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. त्यामुळं हा रस्ता पृथ्वीवरचा यमराज मार्ग आहे, असे म्हणावे लागेल.