तभा फ्लॅश न्यूज/ कळंब : मांजरा नदीकाठच्या गावांना, शेतकऱ्यांना, नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने मांजरा नदीच्या धरणात पाणी पातळीत वाढ झाली आहे.
खोंदला येथील एक नागरिक बेपत्ता गेल्या 24 तासापासून शोधकार्य सुरूच आहे. परवेज मुल्ला कळंब : काल दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 8 च्या सुमारास खोंदला गावा जावळील नदीतून पोहतठ जात असताना येथे स्थानिक नागरिक सुब्राव लांडगे पुराच्या पाण्यात अडकले आहेत. त्यांना शोधण्यासाठी स्थानिक प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि बचाव पथकाकडून तातडीची कारवाई सुरू आहे. ड्रोनच्या साहाय्याने परिसराची तपासणी सुरू असून,
सुब्राव लांडगे हे पुराच्या पाण्यात अडकले असून, त्यांना वाचवण्यासाठी गेल्या 24 तासांपासून प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि बचाव पथक वेगाने प्रयत्न करत आहेत.
मांजरा नदीकाठच्या सर्व नागरिकांना आवाहन
परिसरात एखादी व्यक्ती आपत्तीजनक परिस्थितीत दिसल्यास, तत्काळ ग्रामस्थांशी किंवा स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधा, जेणेकरून आमच्या टीमला त्वरित त्या ठिकाणी पोहोचून मदत करता येईल.
















