सोलापूर – जीवनसाथी ॲपवर लग्नाचा खोटा बायोडाटा तयार करून अविवाहित मुलींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या तोतया पोलीस उपनिरीक्षकास सोलापूर शहर सायबर पोलिसांकडून अटक करण्यात आली
वैभव दीपक नारकर (वय 31 राहणार मुक्काम पोस्ट गोविळ तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी सध्या राहणार स्वप्नपूर्ती आपार्टमेट नायगाव म्हाडा बॉम्बे डाईंग मिल कंपाऊंड फ्लॅट नंबर 1907/2 ए मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या होत्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे
मावस भावाचा अपघात झाला व मावशीच्या अंत्यविधीसाठी पैशाची गरज आहे, असे खोटे सांगून भामट्या पोलिस उपनिरीक्षकाने शहरातील एका शिक्षिकेची अार्थिक फसवणूक केली आहे. पोलिस अधिकारी व तक्रारदार शिक्षिकेची जीवनसाथी अॅपवर ओळख झाली होती. दोघांनी एकमेकांना पसंत केले हाेते, लग्नाच्या बंधनात अडकणार होते, भामट्या पोलिस अधिकाऱ्याचे िबंग फुटले.
शहरातील ३० वर्षीय खेळाडू शिक्षिकेने अार्थिक फसवणूक प्रकरणी सायबर पोलिसांत फिर्याद दिली आहे.यावरून मुंबई, दादर येथील वैभव दीपक नारकर ( वय ३१) याच्यावर सोलापूर सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २० जून रोजी दुपारी दोन ते २९ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी तीन या दरम्यान जीवनसाथी अॅप व समाज माध्यमांवर घडली.
तक्रारदार महिला एका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. दोघांची जीवन साथी अॅपवर ओळख झाली होती. नारकरने पोलिस उपनिरीक्षक असून अविवाहित असल्याची माहिती दिली. शिक्षक महिलेने लग्नास तयारी दर्शवली. नारकरने तिचा व तिच्या कुटुंबाचा विश्वास संपादन केला. नारकरने मावस भावाचा अपघात झाला. उपचारांकरिता व त्यानंतर मावशीच्या अंत्यविधी करता पैसे घेतले. १९ जुलै ते ८ ऑगस्ट २०२५ एकुण ६३ हजार इतर ऑनलाइन घेऊन फसवणूक केल्याची फिर्याद दाखल केली आहे.
या गुन्ह्याचा तपास करताना सायबर पोलिसांनी नारकर याचा ठावठिकाणा शोधून त्यास अटक केली आहे
गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक श्रीशैल गजा करत आहेत.
चौकट….
तोतया पोलीस उपनिरीक्षक वैभव नारकर यांनी अशाच प्रकारे महाराष्ट्रामधील मुंबई तसेच इतर जिल्ह्यातील सात ते आठ मुलींना जीवनसाथी वर तो अविवाहित असल्याची खोटी माहिती देऊन त्यांच्याशी विवाह करण्याबाबत बोलणी करून त्यांनाही वेगवेगळी कारणे सांगून त्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे तसेच रत्नागिरी व मुंबई परिसरातील 40 ते 50 मुलींची संपर्क करून तो स्वतः पीएसआय असल्याचे सांगून मंत्रालयातील व पोलीस खात्यातील बरेच अधिकारी त्याच्या चांगल्या परिचयाचे असल्याचे सांगून संबंधित मुलींना पोलीस खात्यात व मंत्रालयात शासकीय नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांची देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाली आहे