पुणे : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत सोमवार, दि. २४ नोव्हेंबर ते रविवार, दि. ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ३०वी तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमाला एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संतश्री ज्ञानेश्वर सभागृह, कोथरूड, पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. तसेच ही व्याख्यानमाला सर्वांसाठी खुली ठेवण्यात आली आहे. अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये, माईर्स एमआयटीचे कुलसचिव डॉ. रत्नदीप जोशी, व्याख्यानमालेचे समन्वयक डॉ. मिलिंद पात्रे व संचालक डॉ. महेश थोरवे उपस्थित होते.
या व्याख्यानमालेचे उद्घाटन सोमवार, दि. २४ नोव्हेंबर २०२५ रोजी सायं ४.०० वा. होईल. या समारंभासाठी स्पेस अॅप्लिकेशन सेंटर इस्त्रोचे माजी संचालक पद्मश्री डॉ.प्रमोद काळे व नवी दिल्ली येथील प्रसिद्ध लेखक, संशोधक आणि आध्यात्मिक शास्त्रज्ञ डॉ. सी.के.भारद्वाज हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड असतील. तसेच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल वि. कराड हे उपस्थित राहणार आहेत.
व्याख्यानमालेचा समारोप रविवार, दि. ३० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वा. होईल. प्रसिद्ध लेखक व ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष श्री.विश्वास पाटील हे प्रमुख पाहुणे असतील. तसेच एमकेसीएलचे मुख्य मार्गदर्शक डॉ. विवेक सावंत हे अध्यक्षस्थान भूषवतील.
२५ ते २९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सायं. ४.०० वा. होणार्या व्याख्यानमालेत वैश्विक स्तरावरील किमया आश्रमचे स्वामी कृष्णा चैतन्य (आधुनिक जीवन पद्धती आणि अध्यात्म), इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्चच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सचे अध्यक्ष डॉ. अरविंद नातू (मेडिसीन २५, पारंपारिक ज्ञानातील मुळे आणि शांतता), पुणे येथील डीआरडीओचे माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ काशिनाथ देवधर (संरक्षण तंत्रज्ञानातील आत्मनिर्भरता हे विश्वगुरू भारताच्या दिशेने एक पाऊल), ओरिजिनोट वेलनेस चे सीईओ केशव वेल्हाळ (ओम टू क्वांटम कॉम्प्युटिंग-ए पाथवे फॉर वर्ल्ड पीस) आणि सनदी अधिकारी व महाराष्ट्र राज्याचे उपलोकायुक्त डॉ. संजय भाटिया (जनसेवेत विश्वशांती)अशा मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत.
या व्याख्यानमालेला जोडूनच सकाळी ८.४५ ते १२.०० पर्यंत कार्यशाळा होणार आहे. यामध्ये सुप्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ.संजय उपाध्ये, किंकर विठ्ठल रामानूज व किंकर विश्र्वेशरै आनंदा, एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे सह. अधिष्ठाता डॉ.बी.एस.नागोबा, यशदा पुणेचे संचालक रंगनाथ नाईकडे, फिल्म निर्माता व अभिनेता मुकेश खन्ना, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिच्या एलटीसीचे संचालक सुनील लोढा व दिपाली लोढा, वरिष्ठ अभियंता विष्णू भिसे, सुप्रसिद्ध गीतकार समिर अंजान, अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रभारी डॉ. ताहेर एच. पठाण, परमपूज्य स्वामी सवितानंद, प्रसिद्ध हृदय रोग तज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण हे विविध विषयांवर विचार मांडतील.
प्रत्येक व्याख्यानानंतर वक्ता व श्रोते यांच्यामधील प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम या व्याख्यानमालांचे वैशिष्ट्य आहे. विशेष म्हणजे या मध्ये २५ ते २९ नोव्हेंबर पर्यंत माईर्स एमआयटी विश्वशांती विद्यापीठ संकुलातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांसाठी स. ७.०० ते ८.०० या वेळात योगासन वर्गाचे आयोजन क्रीडा विभागाचे संचालक अभय वाघ व योगगुरु श्री. अनंत कोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.
‘विज्ञान व अध्यात्माच्या समन्वयातूनच जगामध्ये शांतता नांदेल’, हे स्वामी विवेकानंदांचे वचन व तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर माऊली व जगद्गुरु संतश्री तुकाराम महाराज यांच्या ज्ञानेश्वरी व गाथेतील ज्ञान-विज्ञानाधिष्ठित तत्त्वदर्शन हा या व्याख्यानमालेचा मुख्य हेतू आहे.
या व्याख्यानमालेसाठी शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, तसेच साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांना निमंत्रित केले असून, मानवी आणि आध्यात्मिक मूल्यांचे या व्याख्यानमालेद्वारे संवर्धन व्हावे, हा या व्याख्यानमाले मागील प्रमुख उद्देश आहे.
ही व्याख्यानमाला विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा.कराड यांच्या प्रेरणेने तसेच, माईर्स एमआयटीचे व्यवस्थापकीय विश्वस्त आणि कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल वि. कराड यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत आहे.
जनसंपर्क विभाग,
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे.



















